BJP Workers Upset On Naresh Mhaske Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024 : नवी मुंबईत भाजपमध्ये अचानक राजीनामासत्र; निवडणूक धामधुमीत असं काय घडलं?

BJP Workers Upset On Naresh Mhaske: नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोधत करत भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. आमदार गणेश नाईक यांच्या समोर पदाधिकाऱ्यांनी आक्रोश करत सर्वांनी एकत्र येत आपले राजीनामे लिहिले आहेत.

Priya More

सिद्धेश म्हात्रे, नवी मुंबई

ठाणे लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून शिवसेना शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांना उमेदवारी देण्यात आली. नरेश म्हस्केंच्या उमेदवारीवरून नवी मुंबईतील भाजपचे पदाधिकारी नाराज झाले आहेत. नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला विरोधत करत भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. आमदार गणेश नाईक यांच्या समोर पदाधिकाऱ्यांनी आक्रोश करत सर्वांनी एकत्र येत आपले राजीनामे दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीवरून भाजपमध्ये नाराजी पाहायला मिळत आहे. नरेश म्हस्के हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांना उमेदवारी दिल्यामुळे नवी मुंबईतील भाजप पदाधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा देण्यास सुरूवात केली आहे. भाजप पदाधिकाऱ्यांना नरेश म्हस्केंची उमेदवारी मान्य नाही. संजीव नाईक सक्षम उमेदवार असताना नरेश म्हस्केंना उमेदवारी का?, असा सवाल भाजप पदाधिकाऱ्यांनी केला आहे. राजीनामा दिल्यानंतर हे पदाधिकारी मुंबईच्या दिशेला निघाले असून ते भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेणार आहेत.

नरेश म्हस्के यांनी आज गणेश नाईक यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी पदाधिकाऱ्यांसोबत बैठक देखील घेतली. पण या बैठकीमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांनी नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला विरोध केला. त्यामुळे नरेश म्हस्के बैठकितून निघून गेले. भाजप पदाधिकाऱ्यांनी यावेळी निवडणुकित नरेश म्हस्के यांचे काम करणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. आमदार गणेश नाईक यांच्यासमोरच भाजप पदाधिकाऱ्यांनी आक्रोश केला.

दरम्यान, ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचा तिढा अखेर बुधवारी संपला. या मतदारसंघात नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाकरे गटाकडून राजन विचारे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे या मतदार संघात राजन विचारे विरुद्ध नरेश म्हस्के अशी लढत होणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नरेश म्हस्के यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आभार मानले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

Traffic Rules: चप्पल घालून कार चालवल्याने चलान लागतं? काय आहे नियम?

मोठी बातमी! भाजपा फुटली; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT