tanaji mutkule claims hingoli lok sabha constituency for bjp saam tv
लोकसभा २०२४

Hingoli Lok Sabha Election 2024 : हिंगोलीची जागा भाजप जिंकून दाखवेल, हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध; मुटकुळेंसह शिष्टमंडळ फडणवीसांच्या भेटीला

Tanaji Mutkule : काही वेळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ,उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार नांदेड विमानतळावर दाखल होणार आहेत.

Siddharth Latkar

- संजय सूर्यवंशी

Nanded :

हिंगोली लोकसभा मतदारसंघात (hingoli lok sabha constituency) भाजपाचे काम चांगले आहे. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार असावा अशी मतदारसंघातील अनेकांची मागणी आहे. ही मागणी आता हिंगोलीचे भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे (mla tanaji mutkule) यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे साम टीव्हीशी बाेलताना सांगितले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

हिंगोली भाजपाचे शिष्टमंडळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी आज (साेमवार) नांदेड विमानतळावर दाखल झाले. या शिष्टमंडळामध्ये भाजपाचे आमदार तानाजी मुटकुळे, आमदार भीमराव केराम, आमदार नामदेव ससाणे, माजी खासदार शिवाजी माने, माजी आमदार गजानन गुघे यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी यांचा समावेश आहे.

हिंगोली लोकसभेसाठी शिंदे गटाचे खासदार हेमंत पाटील (mp hemant patil) यांना पुन्हा संधी दिली आहे. भाजपाने हेमंत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे. भाजपाने हिंगोली लोकसभेसाठी गत पाच वर्षात चांगली तयारी केली आहे. आम्ही लोकसभेची जागा निश्चित निवडून आणू असा विश्वास कार्यकर्त्यांना आहे.

भाजपचे काम हिंगोली लोकसभा मतदारसंघात चांगले आहे. भाजपचा उमेदवार या मतदारसंघात हवा अशी मागणी हिंगोलीचे भाजपचे आमदार तानाजी मुटकुळे यांनी नमूद केले. त्यासाठी ते आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. आमदार मुटकुळे हे उमेदवार बदलण्याची मागणी फडणवीस यांना करणार आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gram Panchayat Elections: दिवाळीत उडणार ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा बार? मतदानाबाबत नवी अपडेट आली समोर

माझ्या नादी लागू नका, जरांगेंचा मुंडेंना इशारा; आता संघर्ष आणखी पेटणार? VIDEO

Wednesday Horoscope : अविवाहित तरुणांचं सूत जुळणार; 5 राशींच्या लोकांसाठी बुधवार गेमचेंजर ठरणार

सरकार साधणार होळीचा मुहूर्त; कर्मचाऱ्यांना मिळणार महागाई भत्ता

T20 World Cup : सुपर ८ चं समीकरण ठरलं! ३ संघांना भिडणार भारत, कधी आणि कुठे होणार सामने? संपूर्ण वेळापत्रक

SCROLL FOR NEXT