sushma andhare comment on udayanraje bhosale lok sabha election 2024 saam tv
लोकसभा २०२४

'मविआ'ने शाहू महाराज छत्रपतींचा सन्मान राखला, भाजपकडून उदयनराजे वेटींगवर : सुषमा अंधारे

Udayanraje Bhosale Latest Marathi News : सातारा लाेकसभा मतदारसंघातून भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांनी लाेकसभा निवडणुक लढविण्यासाठी जय्यत तयार केली आहे.

Siddharth Latkar

- अमर घटारे

Amravati :

छत्रपती शाहू महाराजांना उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व नेते त्यांच्याकडे गेले. सर्वांनी काेल्हापूरात जाऊन सन्मानाने महाराजांना उमेदवारी अर्ज दिला. दुसरीकडे उदयनराजेंना (Udayanraje Bhosale) चार चार दिवस अमित शहा, पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी वेटिंगवर ठेवले गेले, याला काय म्हणायचे असा सवाल करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी भाजपवर बाेट ठेवले. त्या अमरावती येथे माध्यमांशी बाेलत हाेत्या. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सातारा लाेकसभा मतदारसंघातून (satara lok sabha constituency) भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले (Udayanraje Bhosale Latest Marathi News) यांनी लाेकसभा निवडणुक लढविण्यासाठी जय्यत तयार केली आहे. तीन दिवसांपूर्वी खासदार उदयनराजेंनी साता-यात शक्तीप्रदर्शनही केले. त्यावेळी त्यांनी कमळ चिन्हावरच निवडणुक लढणार असेही स्पष्ट केले.

दरम्यान उदयनराजे भाेसले यांना अद्याप महायुतीने उमेदवारी जाहीर केली नसल्याने राज्यात तर्कवितर्क लढविले जात आहेत. शिवसेना नेत्या अंधारे यांनी देखील उदयनराजेंच्या उमेदवारीविषयी बाेलताना महाविकास आघाडीने काेल्हापूर संस्थानाला उमेदवारी देण्यासाठी महाविकास आघाडीने सन्मानपूर्वक वागणुक दिली. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वारसदार उदयनराजे भाेसले यांना भाजप नेत्यांनी मात्र वेटींगवर ठेवले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखडे यांनी आज अमरावती लोकसभेसाठी आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी आमदार बळवंत वानखडे यांच्या प्रचारार्थ अमरावतीच्या नेहरू मैदानात शक्ती प्रदर्शन करत महाविकास आघाडीची पहिलि प्रचार सभा पार पडली. यावेळी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे, काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यासह महाविकास आघाडीतील सर्व नेते उपस्थित होते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: आदिवासी आश्रमशाळेत पाण्याची टाकी कोसळून एका 14 वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू

Horoscope Wednesday : 'या' क्षेत्रात नोकरी करण्याऱ्यांची चांदीच चांदी, काहींच्या कटकटी होतील दूर, वाचा राशीभविष्य

PM Modi: अमेरिकेतून रात्रीच्यावेळी कॉल आला अन्...; PM मोदींनी लोकसभेत सांगितली Operation Sindoor ची कहाणी

Pune ST Bus : एसटी बस कंडक्टरवर जीवघेणा हल्ला, लोखंडी रोडने मारहाणीचा प्रयत्न; पुण्यात भयंकर घडलं

Beed News: धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांसाठी राबवण्यात येणाऱ्या योजनेचे वाजले तीन-तेरा|VIDEO

SCROLL FOR NEXT