Petition Filed in Delhi High Court Against Pm Modi SAAM TV
लोकसभा २०२४

PM Modi: देव आणि धार्मिक स्थळांच्या नावावर मागितली मते? PM मोदींविरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल

Delhi High Court: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात एका वकिलाने दाखल केली आहे.

Pramod Subhash Jagtap

Petition Filed in Delhi High Court Against Pm Modi:

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास बंदी घालावी, अशी विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयात एका वकिलाने दाखल केली आहे.

याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देव आणि धार्मिक स्थळांच्या नावावर मते मागून आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केले आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यास त्यांच्यावर बंदी घालावी.''

आनंद एस. जोंधळे नावाच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली आहे. जोंधळे यांनी त्यांच्या याचिकेत पंतप्रधान मोदींच्या उत्तर प्रदेशातील पिलीभीत येथे ९ एप्रिल रोजी केलेल्या भाषणाचा हवाला दिला आहे आणि म्हटले आहे की, त्यांच्या भाषणादरम्यान त्यांनी मतदारांना हिंदू देवता आणि हिंदू धार्मिक स्थळे, तसेच शीख देवतांचे वर्णन करत मतदान करण्याचे आवाहन केले.

बार अँड बेंचच्या वृत्तानुसार, याचिकेत म्हटले आहे की, "प्रतिवादी क्रमांक 2 (पीएम मोदी) यांनी त्यांच्या भाषणात कथितपणे सांगितले की, त्यांनी राम मंदिर बांधले आहे. प्रतिवादी क्रमांक 2 ने असेही म्हटले आहे की, त्यांनी करतारपूर साहिबचा विकास केला आहे. कॉरिडॉर आणि गुरुद्वारांमध्ये लंगरमध्ये वापरल्या जाणाऱ्या पदार्थांवरून जीएसटी काढला. याचिकेत म्हटले आहे की, प्रतिवादी क्रमांक 2 ने असेही सांगितले की त्याने अफगाणिस्तानातून गुरु ग्रंथ साहिबच्या प्रती परत मागवल्या आहेत.''

याचिकाकर्त्याने आपल्या याचिकेत म्हटले आहे की, पंतप्रधान मोदींनी केवळ हिंदू, शीख देवतांच्या आणि त्यांच्या प्रार्थनास्थळांच्या नावावर मते मागितली नाहीत, तर विरोधी राजकीय पक्षांविरुद्ध ते मुस्लिमांची बाजू घेत आहेत, असं म्हणत टीका केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सोयाबीनचे बियाणे विक्री करणाऱ्या 'बूस्टर' कंपनीविरोधात अमरावतीत गुन्हा

SET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! SET परीक्षा पुढे ढकलली, नेमकं कारण काय? कधी होणार परीक्षा? वाचा A to Z अपडेट्स

Sindhudurg Tourism : मालदीव विसरा! महाराष्ट्रातच आहे 'हा' निसर्गरम्य समुद्रकिनारा, पावसाळ्यात दिसतं आरशासारखं निळेशार पाणी

Salman Khan : सलमान खानने विकले मुंबईतील आलिशान घर; किती कोटींमध्ये झाली डील, आकडा पाहून व्हाल चकित

Weather Update: पावसाची विश्रांती, उन्हाचा चटका वाढला; राज्यात मान्सून कमकुवत का झाला? हवामान विभागानं कारण सांगितलं

SCROLL FOR NEXT