shivtej mohite patil meets shivsena solapur leader shivaji sawant madha lok sabha constituency  saam tv
लोकसभा २०२४

Madha Lok Sabha Constituency : माेहिते पाटील 'माढा'त शिवसैनिकांना करु लागले आपलसं, रणजितसिंह नाईक निंबाळकरांना देणार शह?

Maharashtra Election 2024 : माढा लाेकसभा मतदारसंघात भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उमेदवारीस महायुतीमधील विजयसिंह माेहिते पाटील गटाने विराेध दर्शविला आहे.

भारत नागणे

Madha Lok Sabha Election 2024 :

माढा लाेकसभा मतदारसंघात विद्यमान भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर (bjp mp ranjitsinh naik nimbalkar) यांच्यावर शिवसैनिक (shivsena) नाराज असल्याने त्याचा फायदा उठविण्यासाठी याच मतदारसंघातून निवडणुक लढवू इच्छिणारा महायुतीमधील भाजपचाच माेहिते पाटील गटाने (mohite patil faction) शिवसैनिकांच्या भेटीवर जाेर दिला आहे. या भेटीगाठींमुळे नाईक निंबाळकर गटावर परिणाम हाेणार का हे आगामी काळाच सांगू शकेल. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

माढा लाेकसभा मतदारसंघातून भाजप नेते धैर्यशील मोहिते पाटील (dhairyasheel mohite patil) यांनी निवडणूक लढवण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी मोहिते पाटील कुटुंबियांनी मतदार संघातील विविध तालुक्यातील दौ-यांवर भर दिला आहे. जनतेच्या तसेच विविध पक्षातील नेत्यांच्या कार्यकर्त्यांची ते भेटीगाठी घेत आहेत. (Maharashtra News)

अकलूजचे माजी सरपंच शिवतेज मोहिते पाटील (shivtej mohite patil) यांनी आज (बुधवार) शिंदे गटाचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख शिवाजी सावंत (shivsena leader shivaji sawant) यांची माढा तालुक्यातील वाकव या गावी जाऊन भेट घेतली. शिवाजी सावंत यांनी शिवतेज मोहिते पाटील यांचे स्वागत केले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सावंत आणि मोहिते पाटील‌ यांच्यामध्ये सुमारे अर्धातासभर चर्चा झाली. या चर्चेचा तपशिल समजू शकला नसला तरी सावंत, मोहिते पाटील यांच्या भेटीची माढा मतदारसंघात जोरदार चर्चांना उधाण आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mahadev Temple: शिवमंदिरात महिलांनी केव्हा जावे? जाणून घ्या योग्य वेळ

Valheri Waterfall: मुसळधार पावसामुळे वाल्हेरी धबधब्याचे सौंदर्य खुलले; पर्यटकांची प्रचंड गर्दी| VIDEO

Muharram : मोहरमच्या आनंदावर विरजण, आगीत हनुमंतचा मृत्यू; काळजात धस्स करणारी घटना

GK: टोमॅटो अन् बटाटापेक्षा स्वस्त काजू! जाणून घ्या भारतातील 'हे' अनोखे ठिकाण

Pimpri Chinchwad : हिंजवडीच्या पुरस्थितीनंतर पीएमआरडीएचे कठोर पाऊल; चार जणांवर केला गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT