शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये (Shirur Lok Sabha Constituency) महाविकास आघाडीचे उमेदवार अमोल कोल्हे (Amol Kokhe) हे आघाडीवर आहेत. तर महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे पिछाडीवर आहेत. अमोल कोल्हे आठव्या फेरी अखेर आघाडीवर आहेत. त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते आनंदी झाले असून सध्या शिरूरमध्ये आनंदाचे वातावर आहे. अमोल कोल्हे यांचे कार्यकर्ते फटाके फोडत, गुलालाची उधळण करत आणि पेढे वाटप करत जल्लोष करताना दिसत आहेत.
शिरुरमधून अमोल कोल्हेंची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु आहे. आठव्या फेरी अखेर अमोल कोल्हे हे ३६,८१५ मतांनी आघाडीवर आहेत. तर शिवाजीराव आढळराव पाटील हे पिछाडीवर आहेत. अमोल कोल्हे यांना शिरूर लोकसभा मतदार संघातील सहाही विधानसभा मतदारसंघात मोठं मताधिक्य मिळत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने खेड, आंबेगाव, शिरूर विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी फटाके फोडून मोठा जल्लोष केला. पुणे-नगर महामार्गावर कोल्हे समर्थकांनी जल्लोष करत फटाके फोडले. तर काही कार्यकर्त्यांनी अमोल कोल्हे यांना पेढा भरवत शुभेच्छा दिल्या.
काही ठिकाणी अमोल कोल्हे यांच्या समर्थकांनी फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करून जल्लोष केला. अमोल कोल्हे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे. त्यामुळे अमोल कोल्हेच्या घरी कार्यकर्ते येऊ लागले आहेत. खासदारकीचा डबल बार होणार असल्याने कार्यकर्ते अमोल कोल्हेंना शुभेच्छा देण्यास गर्दी करू लागलेत.
दरम्यान, अमोल कोल्हेंची सप्तधेनु गोमातेसमोर ध्यानधारणा केली. अमोल कोल्हे यांची विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू असताना त्यांनी सप्तधेनु गोमातेसमोर गाईच्या गोठ्यात ध्यान केले. अमोल कोल्हेंनी मतदानाच्या दिवशी पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला होता आणि आज मतमोजणीच्या दिवशीही पिवळ्या रंगाचा शर्ट परिधान केला असून गोमातेसमोर ध्यान केले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.