लोकसभा २०२४

Shirur Loksabha Election: शिरुरमध्ये महायुतीला धक्का! अतुल देशमुखांचा भाजपला रामराम

Maharashtra Politics: आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधून मोठा विरोध पाहायला असून भाजपाचे नेते आणि खेड आळंदी विधानसभेचे समन्वयक अतुल देशमुख पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

रोहिदास गाडगे

Shirur Loksabha Constituency News:

शिरुर लोकसभेसाठी महायुतीकडून शिवाजीराव आढळराव पाटील यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आढळराव पाटील हे राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहेत. मात्र आढळराव पाटील यांच्या उमेदवारीला भाजपमधून मोठा विरोध पाहायला असून भाजपाचे नेते आणि खेड आळंदी विधानसभेचे समन्वयक अतुल देशमुख पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, शिरुर लोकसभेसाठी शिवाजी आढळराव पाटीलांच्या (Shivajirao Adhalrao Patil) यांना उमेदवारी दिल्यानंतर भाजपात(BJP) नाराजी पाहायला मिळत आहे. अशातच आता भाजपाचे नेते आणि खेड आळंदी विधानसभेचे समन्वयक अतुल देशमुख भाजपातुन बाहेर पडणार असल्याचे जाहीर केले आहे.

भाजपाच्या सर्व पदांचा राजीनामा देऊन आम्हीच तुम्हाला सोडतोय अशी थेट भुमिका घेत अतुल देशमुख यांनी भाजपाला रामराम ठोकला आहे. भाजपाने विकासाबाबत विश्वासात घेतले नाही. ज्या पक्षात काम करतो तेच आपला विचार करत नसल्याची खंत व्यक्त करत अतुल देशमुख यांनी पक्ष ताकद देत नसल्याने बाहेर पडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच आपल्या पदाचा राजीनामाही प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.

दरम्यान, भारतीय जनता पक्षातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर अतुल देशमुख यांनी कार्यकर्त्यांना विश्वासात घेण्यासाठी तातडीची बैठक बोलावली आहे. अतुल देशमुख हे उत्तर पुणे जिल्ह्यातील भाजपाचे मोठे नेतृत्व आहे. त्यामुळे ऐन लोकसभेच्या रणधुमाळीत त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. आता भाजपातून बाहेर पडल्यानंतर अतुल देशमुख काय भुमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maratha reservation : मराठा समाजासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'या' प्रलंबित मागण्यांवर मोहर; त्वरित मिळणार लाभ

Wednesday Horoscope : गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळेल, वाणीवर लक्ष असू द्या; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Ladki Bahin Yojana : खात्यात इतक्या रूपयांचा हप्ता आला की नाही? लाडक्या बहिणींसाठी मोठे सरप्राईज; आताच बॅलेन्स करा चेक

Mumbai Ganeshotsav: भुलेश्वर दुर्घटनेनंतर BMC चा मोठा निर्णय! मोठ्या गणेशमूर्तीसाठी फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक

Modi Cabinet Expansion: केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार? १२ खाती अन् इच्छुकांची यादी मोठी

SCROLL FOR NEXT