Shrirang Barne On Ajit Pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Maval Lok Sabha: निकालापूर्वीच मावळमध्ये महायुतीत खदखद, बारणे म्हणतात दादा आले पण 'पावर' नाही

Shrirang Barne On Ajit Pawar: आधी जागावाटपावरून वाद, त्यानंतर उमेदवार ठरवण्यावरून वाद, आता मतदान झाल्यानंतरही महायुतीतला वाद उफाळून आलाय.

साम टिव्ही ब्युरो

विनोद पाटील, साम टीव्ही प्रतिनिधी

आधी जागावाटपावरून वाद, त्यानंतर उमेदवार ठरवण्यावरून वाद, आता मतदान झाल्यानंतरही महायुतीतला वाद उफाळून आलाय. मावळ लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचे उमेदवार श्रीरंग बारणे यांची मतदानाला आठवडा उलटल्यानंतर आता अजित पवार गटाबाबतची खदखद बाहेर आलीय. अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी 100 टक्के काम केलं नसल्याचा आरोप केलाय. याबाबत त्यांनी अजित पवारांकडेही तक्रार केल्याचं सांगितलं.

'राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी काम केलं नाही'

शिंदे गटाचे मावळचे उमेदवार श्रीरंग बारणे म्हणाले आहेत की, ''अजित पवार आणि पार्थ पवार यांनी माझा चांगल्या प्रकारे काम केलं. त्यांनी कार्यकर्त्यांना ताशा प्रकारच्या सूचना दिल्या. मात्र खालील फळीमधील कार्यकर्ता सुरुवातीपासून नाराज होता आणि ही नाराजी शेवटपर्यंत राहिली. काही काही कार्यकर्त्यांनी यावेळी चुकीच्या पद्धतीने काम केलं आहे, हे नाकारून चालणार नाही. परंतु नेत्यांनी, आमदारांनी चांगल्या पद्धतीने काम केलं.''

हा आरोप करताना बारणे अजित पवार गटाचे आमदार आणि नेत्यांनी काम केल्याची पुस्ती जोडायलाही विसरले नाहीत. अजित पवार गटाच्या आमदारांनी मात्र बारणेंचे आरोप फेटाळून लावले आहेत. निकालानंतर अपयशाचं खापर फोडण्यासाठी बारणेंनी हे आरोप केल्याचा दावा अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंनी केलाय.

'अपयश लपवण्यासाठी बारणेंचे आरोप'

अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके म्हणाले आहेत की, ही माहिती त्यांच्याकडे होती, तर त्यांनी मतदान होण्याआधी ही माहिती द्यायला हवी होती. परंतु आता मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आणि निवडणूक थोडं मताधिक्य कमी होईल. हे मताधिक्य कमी होताना जर कोणावरती आरोप करायचे तर, हे अपयश लपवायचं, तर ते राष्ट्रवादीच्या कार्यकर्ता किंवा पदाधिकाऱ्यावर खापर फोडण्याचं काम बारणे यांनी करू नये.''

दरम्यान, मावळमध्ये 2019 साली श्रीरंग बारणेंनी अजित पवारांचा मुलगा पार्थ पवार यांचा पराभव केला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना हा पराभव चांगलाच जिव्हारी लागला होता. त्यात अजित पवारांची राष्ट्रवादी युतीसोबत गेली. मात्र दादांच्या कार्यकर्ते बारणेंसोबत गेले की नाही याचा निकाल आता 4 जूनलाच लागणार...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold Rate Today: आठवड्याच्या सुरुवातीलाच सोनं स्वस्त! पाहा तुमच्या शहरातील २४, २२ आणि १८ कॅरेटचे ताजे दर

Maharashtra News Live Update: उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार रायगडमध्ये दाखल

Cardio Workout at Home: घरच्या घरी करा कार्डिओ वर्कआउट; फिट आणि अॅक्टिव्ह राहण्यासाठी या ७ एक्सरसाइज बेस्ट

Goregaon Mulund Link Road: दिंडोशी कोर्ट ते फिल्मसिटी आता सुसाट जा, फ्लायओव्हर या दिवशी होणार सुरू; गोरेगाव मुलुंड लिंकरोडवर मोठी अपडेट

Weight Loss Tips: वजन कमी करण्यासाठी मेहनत करूनही फरक दिसत नाही? नकळत होणाऱ्या 'या' चुका पडू शकतात महागात

SCROLL FOR NEXT