shashikant shinde says nationalist congress party sharadchandra pawar will win satara constituency  saam tv
लोकसभा २०२४

Satara Constituency: उदयनराजे, शिवेंद्रराजेंचे आव्हान कसं पेलणार? शशिकांत शिंदेंनी हसत हसतच सांगितलं

Lok Sabha Election 2024 : सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे आज आमदार शशिकांत शिंदे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.

Siddharth Latkar

- सिद्धेश म्हात्रे

Shashikant Shinde News :

सातारा लोकसभा मतदारसंघात (satara lok sabha constituency) कोणतेही आव्हान नाही. आम्हांला विजयाची खात्री आहे. या मतदारसंघात महायुतीला (mahayuti) अद्याप उमेदवार जाहीर करता आलेला नाही. यामुळे साताऱ्यातील निकाल हा वेगळा असणार असेही आमदार शिंदे यांनी नमूद केले. दरम्यान उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) हे राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हाच्या माध्यमातून खासदार झाले हाेते. तेव्हापासून हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे आणि राहणार कारण ही निवडणुक आता जनतेने हाती घेतल्याचे शिंदेंनी नमूद केले. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

सातारा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटातर्फे शशिकांत शिंदे यांना आज उमेदवारी जाहीर करण्यात आली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांचे नवी मुंबईतील एपीएमसी कांदा बटाटा मार्केटमध्ये स्वागत करण्यात आले. ढोल ताशांच्या गजरात तुतारी वाजवत कार्यकर्त्यांनी शशिकांत शिंदे यांचे स्वागत केले.

आमदार शशिकांत शिंदे म्हणाले उमेदवारी जाहीर केल्याबद्दल मी स्वतःला धन्य मानतो. दाेन्ही राजेंचे तुमच्या पुढं आव्हान असणार या प्रश्नावर शिंदे म्हणाले सातारा लोकसभा मतदारसंघात कोणतेही आव्हान नसून आम्हांला विजयाची खात्री आहे.

महायुतीला अद्याप उमेदवार देखील जाहीर करता आलेला नाही त्यामुळे साताऱ्यात विजयाची खात्री असल्याचा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केला.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai Shocking : मुंबई हादरली ! १५ वर्षीय मुलीवर जन्मदात्या वडिलांकडून बलात्कार, आईचाही समावेश

Shravana 2025: श्रावणात शिवलिंग पूजा करताना 'या' ७ वस्तू टाळा, होऊ शकतो अपशकुन

Liver cirrhosis last stage: लिव्हर सिरोसिसच्या लास्ट स्टेजमध्ये शरीरात होतात 'हे' मोठे बदल; यकृत सडण्याची लक्षणं वेळीच ओळखा

HBD Ranveer Singh : रणवीर सिंहचं ५ सुपरहिट चित्रपट, पहिला सिनेमा कोणता?

Maharashtra Live News Update: सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी आज येलो अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT