shashikant shinde leads in satara constituency against udayanraje bhosale lok sabha election result 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Udaynraje Bhosale Trails: उदयनराजेंच्या विराेधात शशिकांत शिंदेंनी आघाडी घेताच ल्हासुर्णेत जल्लाेष, वाईत विजयाचे पाेस्टर झळकले (पाहा व्हिडिओ)

ओंकार कदम

सातारा लोकसभा मतदारसंघात भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले यांच्या विराेधात राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे विधान परिषदेचे आमदार शशिकांत शिंदे यांनी पाचव्या फेरी अखेर 21 हजार मतांची आघाडी घेतली आहे. त्यांच्या मतांची आघाडी वाढतच असून आमदार शशिकांत शिंदे यांच्या समर्थकांनी कोरेगाव येथे जल्लाेष सुरु केला. (lok sabha nivadnuk nikal 2024)

आमदार शशिकांत शिंदे यांच्या लासु-हणे येथील निवासस्थानी कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून आनंदाेत्सव साजरा केला. वाई येथे देखील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आमदार शशिकांत शिंदे यांच्या विजयाचे बॅनर लावण्यास प्रारंभ केला आहे.

आमदार शशिकांत शिंदे यांनी हजाराे मतांची आघाडी घेताच त्यांच्या निवासस्थानी समर्थकांनी फटाके वाजवले. काहींनी गुलाल उधळला. दरम्यान दहाव्या फेरी अखेर शशिकांत शिंदे 5156 मतांनी आघाडीवर आहे. शशिकांत शिंदेंच्या आघाडीत मोठी घट झाली आहे. शशिकांत शिंदे यांना 326847 मते तर उदयनराजे भोसलेंना 321691 मते मिळाली आहेत. त्यानंतर बाराव्या फेरी अखेर शशिकांत शिंदे 795 मतांनी आघाडी घेतली.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kesar Panchmeva Kheer: देवी भरभरून आशीर्वाद देईल आणि प्रसन्न होईल; नैवेद्यात बनवा पंचमेवा खिर

Mumbai Local Train : मुंबईकरांनो, नवरात्रीत बाहेर पडताय? उद्या रेल्वेच्या 'या' मार्गांवर मेगाब्लॉक; पाहा वेळापत्रक

IND-W vs NZ-W: हरमनप्रीतला राग अनावर; पराभवानंतर या खेळाडूंवर भडकली; सांगितलं पराभवाचं नेमकं कारण

Pune Crime: पुणे पुन्हा हादरले! ५ वर्षांच्या चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार, कोंढव्यातील संतापजनक प्रकार

Viral Video: कहरच..! भररस्त्यात प्रेमीयुगुलाने मारली मिठी, ट्रॅफिक फुल्ल जाम; लोक बघतच राहिली

SCROLL FOR NEXT