Sharad Pawar Saam Digital
लोकसभा २०२४

Sharad Pawar : जरा जपून, सरळ करायला वेळ लागणार नाही; शरद पवारांनी भर सभेत भरला आमदाराला दम

Lok Sabha Election 2024 : अरे मामा जरा जपून, काय बोलतोय हे लक्षात ठेव, कुणासाठी बोलतोय हे लक्षात ठेव, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना भर सभेत दम भरला.

Sandeep Gawade

अरे मामा जरा जपून, काय बोलतोय हे लक्षात ठेव, कुणासाठी बोलतोय हे लक्षात ठेव, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना भर सभेत दम भरला. आज इंदापूर शहरात सुप्रिया सुळे यांच्या प्रचारार्थ सांगता सभेत ते बोलत होते.

काही लोकांना आम्ही आमदार केलं, त्यांना मंत्री केलं. ते सांगतात की तुम्ही जर दुसऱ्यांना सहकार्य केलं तर आम्ही तुमच्या शेतीचे पाणी बंद करू, ही खूपच गमतीशीर गोष्ट आहे. शेतीचम पाणी ही बाप दादाची इस्टेट नाही. ही योग्य गोष्ट नाही, मी त्यांना एकच सांगू इच्छितो. अरे मामा जरा जपून काय बोलतोय हे लक्षात ठेव कुणासाठी बोलतोय हे लक्षात ठेव तुला सरळ करायला वेळ लागणार नाही, असं शरद पवार म्हणाले आहेत.

तिसऱ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस असल्यामुळे बारामती मतदारसंघात सभा आणि मेळाव्यांचा धडाका सुरु आहे. आज शरद पवार यांची इंदापूरमध्ये जाहीर सभा पार पडली. या सभेत बोलताना शरद पवार यांनी दत्तात्रय भरणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.

शरद पवार काय म्हणाले?

इंदापूरमधील लोकांना, तुमच्या शेतातील पाणी बंद करू, अस सांगण्यात आलं आहे. पण शेतीचं पाणी पाणी हे कोणाच्या बापाची इस्टेट नाही. त्यांच्यासाठी काय केले नाही. लहान कुटुंबातील लोकांना मदत करणे, पाठिंबा देणे याची गरज असते. ती भूमिका मी घेतली. मात्र, आज त्यांचे पाय जमिनीवर राहिले नाही. त्यांचे पाय हवेत आहेत. कोणीही सत्तेचा गैरवापर करत दमदाटी करत असेल तर त्यांना त्यांची जागा दाखवणे हे काम मी एक ते दोन दिवसांत करू शकतो. पण आज त्या रस्त्याने जायचे नाही, अशा थेट इशारा पवारांनी या सभेत दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asthma: अस्थमाची लक्षणे कोणती? अशी घ्या काळजी

Bihar Election : निवडणुकीआधी माजी उपमुख्यमंत्र्यांचा दणका; 27 नेत्यांची पक्षातून हकालपट्टी

रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त होणार? चाहत्यांमध्ये खळबळ

Maharashtra Politics: कोकणात वर्चस्वासाठी राणे बंधूंमध्ये संघर्ष, थोपटले एकमेकांविरोधात दंड

Pramod Mahajan Case: प्रमोद महाजनांना का संपवलं? महाजनांच्या हत्येचा नवा अँगल समोर

SCROLL FOR NEXT