shamkant saner supports shobha bachhav in dhule lok sabha election 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Dhule Constituency : धुळ्यातील काँग्रेसच्या नाराजीनाट्यावर अखेर पडला पडदा, जिल्हाध्यक्ष शामकांत सनेरांमुळे शाेभा बच्छाव यांची वाढली ताकद

Dhule Lok Sabha Election : धुळे लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या उमेदवार शोभा बच्छाव या आज काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

भूषण अहिरे

Dhule Congress News :

धुळ्यात काँग्रेस पक्षात सुरू असलेले नाराजीनाट्य थांबविण्यात अखेर काँग्रेस पक्ष श्रेष्ठींना यश आले आहे. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शाम सनेर यांची मनधरणी करण्यात पक्षाला यश आले आहे. त्यामुळेच आज सनेर हे इंडिया आघाडीचे उमेदवार शोभा बच्छाव यांच्या प्रचार रॅलीत सहभागी होणार असल्याची खात्रीशिर माहिती उपलब्ध झाली आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी काही दिवसांपूर्वी धुळे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शामकांत सनेर यांची भेट घेतली. या भेटीनंतर देखील सनेर हे काॅंग्रेस पक्षातील नेत्यांवर नाराज हाेते. परिणामी आगामी काळात सनेर काय भूमिका घेणार याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली हाेती.

दरम्यान धुळे लोकसभेसाठी इंडिया आघाडीच्या उमेदवार (महाविकास आघाडी, काँग्रेस) शोभा बच्छाव या आज काँग्रेसचे जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. यादरम्यान शक्तीप्रदर्शन देखील होणार आहे. शोभा बच्छाव यांच्या प्रचार रॅलीत शाम सनेर हे सहभागी होणार आहेत. यामुळे बच्छाव यांची धुळे मतदारसंघात निश्चितीच ताकद वाढणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Actor Threat Case : बॉलिवूड सेलिब्रिटींना धमकी देणाऱ्या आयटी इंजिनिअरला अटक, चौकशीत धक्कादायक माहिती उघड

Maharashtra News Live Update: उष्णतेपासून बचावासाठी ओंकार हत्तीची नळाच्या पाण्यात मस्ती

Accident : धनत्रयोदशीला काळाचा घाला, भरधाव ट्रकच्या धडकेत ६ जण जागीच ठार, ७ गंभीर जखमी

Weather Update : हवामानात मोठे बदल! ४ राज्यांना पावसाचा अलर्ट; महाराष्ट्रात कसं असेल वातावरण?

Test Retirement: भारताच्या मॅचविनर वेगवान गोलंदाजाची तडकाफडकी निवृत्ती, कसोटी क्रिकेटला अलविदा

SCROLL FOR NEXT