Narayan Rane News Saam TV
लोकसभा २०२४

Narayan Rane: मी सर्वात हुशार विद्यार्थी, अभ्यास करूनच पेपरला बसतो; नारायण राणे काय म्हणाले?

Ratnagiri–Sindhudurg Lok Sabha: संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा सामना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याशी होत आहे.

Satish Daud

संपूर्ण राज्याचं लक्ष लागून असलेल्या रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा सामना ठाकरे गटाचे विद्यमान खासदार विनायक राऊत यांच्याशी होत आहे. नारायण राणेंनी या निवडणुकीत आपली संपूर्ण ताकद लावून दिली आहे.

दरम्यान, नारायण राणे यांनी त्यांच्या वरवडे या गावी जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, "सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा. मी देवाला नमस्कार करून मतदानासाठी आलो आहे. मला यश प्राप्त करून द्यावे, अशी देवाजवळ प्रार्थना"

"मी नेहमीच पेपरला बसतो, त्यावेळी अभ्यास करून बसतो. मी हुशार विद्यार्थी आहे. जे अभ्यास करीत नाहीत, त्यांना पेपर कठीण जातो. मी माझ्या रत्नागिरी सिंधुदुर्गातील मतदार बंधू भगिनी आणि वडीलधारी मंडळींना विनंती करेन की, लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा आहे".

"मोदींनी घोषणा केली आहे की, अब की बार ४०० पार. आमचे ४०० खासदार निवडून येणार. त्यामध्ये आपल्या कोकणचा, हक्काचा आणि तुम्ही अनेक वर्षे प्रेम दिले, त्याप्रमाणे याही वेळेला लोकसभेच्या निवडणुकीसाठी या सर्वांनी मतदान करावे", अशी विनंती नारायण राणे यांनी केली.

नारायण राणेचा मोठ्या मताधिक्यांनी निवडून येणार

दरम्यान, नारायण राणे यांचा तब्बल १ लाखांहून अधिक मतांनी निवडून येणार, असा विश्वास शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी व्यक्त केला आहे. सावंतवाडी मतदारसंघातून राणेंना ७० हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळेल, असा विश्वासही केसरकर यांनी व्यक्त केला आहे.

मंत्री दीपक केसरकर यांनी सावंतवाडी येथे जाऊन सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडी चितारआळी येथील मतदान केंद्रावर केसरकर कुटुंबियांनी मतदान केले. यानंतर दीपक केसरकर यांनी माध्यमांसोबत बोलताना नारायण राणे यांचा मोठा मताधिक्यांनी विजय होणार असं म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: डिझेलसाठी 2-4 किमीच्या रांगा; दोन दिवसांपासून पुरवठा ठप्प

SBI Jobs: खुशखबर! स्टेट बँकेत नोकरीची संधी; ८२१ पदांसाठी भरती जाहीर; पगार ₹८०,०००; अर्ज कसा करावा?

Type 2 diabetes: पुरेशी झोप घेऊनही थकवा जात नाही? टाइप 2 डायबिटीजची ही ५ लक्षणं वेळेत ओळखा

Political News : मोठी बातमी! दिल्लीत बड्या नेत्याच्या घरावर ED ची धाड, राजकारणात खळबळ

Lipstick Shades: ग्लॉसी की मॅट? कोणत्या लिपस्टिकने मिळेल ग्लॅमरस आणि परफेक्ट लूक

SCROLL FOR NEXT