Pune Congress Candidate Controversy Sakal
लोकसभा २०२४

Pune Lok Sabha Constituency: काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी नाट्य संपेना; फ्लेक्सवर 'नेत्याचा' फोटो टाकला नाही म्हणून थेट मंडपवाल्याला मारहाण

Pune Congress Candidate Controversy: पुणे शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसत आहे. फ्लेक्सवर "नेत्याचा" फोटो टाकला नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आली आहे.

Rohini Gudaghe

अक्षय बडवे साम टीव्ही, पुणे

Maharashtra Lok Sabha Election 2024

पुणे शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी नाट्य संपत नसल्याचं (Pune Lok Sabha Constituency) दिसत आहे. आता पुणे शहर काँग्रेसमध्ये फ्लेक्सवर फोटो लावला नाही, यावरून थेट मंडपवाल्याला मारहाण झाल्याच्या प्रकार घडला आहे. हा धक्कादायक प्रकार महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या बैठकीदरम्यान घडल्याची माहिती मिळत (Congress Candidate Controversy) आहे. (latest politics news)

पुणे लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर ( Ravindra Dhangekar) यांच्या बैठकीसाठी फ्लेक्स लावण्यात आले होते. या फ्लेक्सवर "नेत्याचा" फोटो टाकला नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आली ( Maharashtra Politics) आहे. पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या बैठकीमध्ये हा प्रकार घडला आहे. त्यामुळे कॉंग्रेसमधील अंतर्गत नाराजी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर काँग्रेसचे एक नेते (Lok Sabha Election 2024) आणि माजी राज्यमंत्री यांचा फोटो नव्हता. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी फ्लेक्सवर फोटो नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर मेळावा सुरू होण्यापूर्वीच संबंधित नेत्याच्या कार्यकर्त्यांनी मंडपवाल्याला जाब विचारला. त्याला मारहाण (Pune Congress) केली.

काल केसरीवाडा येथे देखील काँग्रेसमधील नाराजी आणि अंतर्गत वाद समोर आले होते. आता पुन्हा घडलेल्या या प्रकारामुळे कॉंग्रेसमधील नाराजी काही संपत नसल्याचं दिसत (Lok Sabha Election) आहे. लोकसभा निवडणूकीच्या तोंडावरच कॉंग्रेसमध्ये नाराजीचे सुर उमटत असल्याचं दिसत आहे.

पुणे शहर काँग्रेसमध्ये अंतर्गत नाराजी नाट्य सुरू असल्याचं दिसत आहे. पुणे लोकसभा महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या बैठकीसाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर "नेत्याचा" फोटो टाकला (Lok Sabha) नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: राज्यसभेच्या जागेसाठी नवनीत राणांचे प्रयत्न? मुख्यमंत्री भेटीमुळे चर्चांना उधाण

Mangalsutra Paan Design: वटपोर्णिमेसाठी ट्राय करा पानाचे सुंदर मंगळसूत्र, पाहा या ७ ट्रेंडी डिझाइन्स

Crime: अमरावती हादरले! बहिणीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला, भरचौकात धारदार शस्त्राने वार करत तरुणाला जागीच संपवलं

Vidhan Parishad Election: राज्यभरात विधानपरिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी; कुठे बिनविरोध, कुठे होणार लढत

Monsoon Update 2026 : मान्सून सर्वात शेवटी कोणत्या राज्यात पोहोचतो? कारण जाणून घ्या

SCROLL FOR NEXT