Priyanka Gandhi  Saam Digital
लोकसभा २०२४

Priyanka Gandhi : प्रियांका गांधींनी भरसभेत दिली महिला आणि युवकांना 'गॅरंटी'; बेरोजगारीवरून भाजपवर हल्लाबोल

Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशमधील गोरखपूरमधील सभेत प्रियंका गांधी यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपवर बेरोजगारीवरून निशाणा साधला. तसंच तरुणांना रोजगार आणि महिलांना दरमहिन्याला आर्थिक मदक करण्याची गॅरंटी त्यांनी दिली.

Sandeep Gawade

उत्तर प्रदेशातील गोरखपूरमध्ये प्रियांका गांधी यांनी जाहीर प्रचारसभेला संबोधित केले. आजघडीला महिला, शेतकरी, तरुण प्रत्येक जण चिंतीत आहे. सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या प्रश्नांवर काँग्रेस आणि इंडिया आघाडी बोलते आणि त्या सोडवण्यासाठी काम करते. आम्ही इतरांसारख्या फुकाच्या, दिशाभूल करणाऱ्या गप्पा करत नाहीत, असा टोला प्रियांका यांनी लगावला.

प्रचाराला येतो तेव्हा बेरोजगारांसाठी आम्ही काय करणार आहोत, महागाई कमी करण्यासाठी काय करणार आहोत, महिलांना सक्षम करण्यासाठी काय करणार यावर बोलतो. बेरोजगार युवकांना नोकरी मिळणार, महिलांच्या बँक खात्यात महिन्याला ८५०० रुपये जमा होणार, अंगणवाडी सेविका, आशा वर्करच्या मानधनात वाढ करू, अशी गॅरंटी प्रियांका गांधी यांनी यावेळी दिली.

तुमचे मत देशाचे भवितव्य ठरवते. देशात होत असलेल्या अन्यायाविरुद्ध आपलं प्रत्येक मत दिलं पाहिजे. शेतकरी असो, तरुण असो की कुस्तीपटू - ज्यांच्यावर अन्याय झाला त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मतदान करा. तुमच्या एक मताने देशातला अन्याय संपेल आणि न्याय प्रस्थापित होईल, अस प्रियंका गांधी म्हणाल्या.

आज काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी आणि मैनपुरीच्या लोकसभा खासदार डिंपल यादव यांनी काशीमध्ये मोठा रोड शो केला. प्रियंका आणि डिंपलच्या या रोड शोमध्ये सपा काँग्रेस कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. प्रियंका गांधी आणि डिंपल यादव यांनी काशीमध्ये त्यांच्या रोड शोची सुरुवात दुर्गाकुंड येथील माँ दुर्गा मंदिरात पूजा करून आशीर्वाद घेऊन केली. यावेळी वाराणसी मतदारसंघातील इंडिया आघाडीचे उमेदवार अजय राय देखील उपस्थित होते. अजय राय यांनी वाराणसी मतदारसंघातून 2014 आणि 2019 मध्ये पीएम मोदींविरोधात निवडणूकही लढवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Lymph Node Health Problems: शरीराच्या 'या' 4 भागांमध्ये गाठ दिसल्यास असू शकतो गंभीर कॅन्सर; कसं कराल निदान?

Delhi Blast: 'इस्लाम में सुसाइड हराम पर बॉम्बिंग...', दिल्ली स्फोटापूर्वीचा दहशतवादी उमरचा VIDEO समोर

निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला गळती, २ बड्या नेत्यांची भाजपमध्ये एन्ट्री

Maharashtra Live News Update: मुख्यमंत्र्याचे मामेभाऊ अल्हाद कलोती नगरसेवक पदासाठी रिंगणात...

Famous Singer Death: प्रसिद्ध गायकाचे ३४ व्या वर्षी निधन; मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, संगीत विश्वावर शोककळा

SCROLL FOR NEXT