लोकसभा २०२४

Maharashtra Loksabha : महाविकास आघाडीत जायचं का नाही? प्रकाश आंबेडकर उद्या घेणार फायनल निर्णय

Maharashtra Loksabha : महाविकास आघाडीसोबत जायचं की नाहीय यावर चर्चा झाली आहे. काँग्रेसच्या नव्या प्रस्तावावर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे.

Bharat Jadhav

(अक्षय गवळी, अकोला)

Maharashtra Loksabha :

महाविकास आघाडीसोबत जायचं का नाही यावर प्रकाश आंबडेकर उद्या सकाळी निर्णय देणार आहेत. वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या कोअर टीमची बैठक संपली आहे. महाविकास आघाडीसोबत जायचं की नाहीय यावर चर्चा झाली आहे. (Latest News)

यासंदर्भात वंचितचे मुख्य प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधलाय. वंचितची पुन्हा एक आज रात्री १० वाजता बैठक होणार आहे. आज रात्रीची ही अंतिम बैठक असणार आहे. या बैठकीत महाविकास आघाडीसोबत जायचं की नाही यावर चर्चा होणार आहे, अशी माहिती त्यांनी दिलीय. यामुळे वंचित बहुजन आघाडी महाविकाससोबत जाणार का नाही याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.

तर दुसरीकडे वंचित सोबत नसली तर महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरल्याचं सांगितंल जात आहे. लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने वंचित बहुजन आघाडी यांच्याशिवाय जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित केलाय. 'शिवसेनेत यादी जाहीर करण्याची परंपरा नाही. संभाव्या उमेदवारांना काम करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मविआत असल्यामुळे उद्या यादी जाहीर करू, असे ठाकरे गटाचे खासदार आणि नेते संजय राऊत म्हणाले. उद्धव ठाकरे यांनी सर्व उमेदवार निश्चित केलेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचीही तयारी झालीय. एकाही जागेवरून संघर्ष, तणाव नाही, असंही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Urine Problem : पावसाळ्यात सतत लघवीला जावे लागते? आताच करा 'हा' घरगुती उपाय

कांद्याचे पाणी मधुमेहाच्या रूग्णांसाठी फायदेशीर, कसे प्यावे? जाणून घ्या

Rain Flood : निसर्गाचं रौद्ररूप! मुसळधार पावसात जनजीवन विस्कळीत, ४४ नागरिकांचा मृत्यू

Maharashtra News Live Update: पंढरपूरमध्ये 4000 वारकऱ्यांची सायकलवारी

Maharashtra Politics: एकनाथ शिंदेंची मोठी खेळी, बड्या नेत्यासह अनेक नगरसेवकांना फोडलं; लवकरच पक्षप्रवेश होणार

SCROLL FOR NEXT