Wardha Loksabha Election  ANI
लोकसभा २०२४

Aligarh News : मतदान करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला; नवरा-बायकोवर गुन्हा

Aligarh latest News : अलीगड शहरातही या प्रकारे मतदान करतानाचा फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Vishal Gangurde

अलीगड : मतदान करताना ईव्हीएमसहित फोटो-व्हिडिओ काढण्यावर निवडणूक आयोगाकडून बंदी असतानाही काही मतदारांकडून असे प्रकार होत आहे. अलीगड शहरातही या प्रकारे मतदान करतानाचा फोटो आणि व्हिडिओ काढण्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे मतदान करतानाचा व्हिडिओ व्हायरल केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तसेच या प्रकारामुळे अपक्ष उमेदवार भ्रष्टाचार विरोधी सेनेचे पंडित केशव देव यांनी निवडणूक रद्द करण्याची मागणी केली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, उत्तर प्रदेशातील बन्नादेवी ठाणे हद्दीतील योगेश गौतम आणि त्यांची पत्नींवर एफआयआर नोंद करण्यात आला आहे. सारसौल येथील इंडियन पब्लिक स्कूल या केंद्रात जाऊन ईव्हीएमवर मतदान केलं होतं. त्यावेळी त्यांनी व्हिडिओ तयार केला. त्यानंतर सोशल मीडियावरील अकाऊंटवरून व्हिडिओ शेअर केला होता. या प्रकरणी दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

दोघांवर मतदान प्रक्रियेची गोपनीयतेचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. यामुळे आचारसंहितेचंही उल्लंघन झालं आहे. या प्रकरणी पोलीस अधिकारी पंकज कुमार मिश्रा यांनी गुन्हा नोंद झाल्याविषयी दुजोरा दिला आहे. यानंतर या मतदारसंघातील निवडणूक रद्द करण्याचीही मागणी केली जात आहे.

सोशल मीडियावर पथकाची नजर

मतदान करताना फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची ही एकच घटना नाही. इतर भागातही अशा घटना घडल्या आहेत. पोलिसांच्या पथकाची सोशल मीडियावर नजर आहे. मतदान करतानाचे व्हायरल व्हिडिओ आढळून आल्यानंतर पुराव्याच्या आधारावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे.

निवडणूक आयोगाच्या निर्देशात म्हटलं आहे की, मतदान केंद्रात मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस नेण्यास बंदी आहे. यासाठी अनेक मतदान केंद्रावर पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

नवी मुंबईत वेश्याव्यवसाय रॅकेटचा पर्दाफाश, ग्राहकांकडून प्रति तास ४ हजार घ्यायचे; पोलिसांनी 'असा' रचला सापळा

Ratnagiri To Kolhapur Travel: रत्नागिरीहून कोल्हापूरला कसे जाल? वाचा सर्वोत्तम वाहतूक पर्याय आणि ट्रॅव्हल टिप्स

Maharashtra Live News Update : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Gujarat Bridge Collapse Update : गुजरात पूल दुर्घटनेत मोठी अपडेट; चार अधिकाऱ्यांचं निलंबन, मृतांचा आकडा १८वर

Shanaya Kapoor : 'आंखों की गुस्ताखियां' चित्रपटात झळकणारी शनाया कपूर नक्की आहे कोण?

SCROLL FOR NEXT