Pm Narendra Modi And Aamit Shah Saam tv
लोकसभा २०२४

Maharashtra Election: पंतप्रधान मोदींचा मास्टर प्लान, महाराष्ट्रात ३ दिवसांत ७ सभा घेणार; महायुतीची ताकद वाढणार?

Narendra Modi Sabha: पंतप्रधान मोदी ३ दिवसांत महाराष्ट्रात तब्बल ७ सभा घेणार आहेत. महायुतीने २७, २९ आणि ३० एप्रिल रोजी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभा घेण्याचं नियोजन केलं आहे.

Satish Daud

Narendra Modi Maharashtra Sabha

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले असून सध्या सर्वत्र प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्रात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट संघर्ष पाहायला मिळत आहे. महायुतीच्या सर्वाधिक जागा निवडून आणण्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा सातत्याने महाराष्ट्रात येऊन प्रचारसभा घेत आहेत. (Lok Sabha Election 2024

आपल्या सभेतून ते महाविकास आघाडीसह शिवसेना ठाकरे गटावर टीकास्त्र सोडत आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) देखील जंगी सभा घेऊन मोदी-शहांच्या टीकेला उत्तर देत आहेत. दरम्यान, पुढील ३ दिवसांत महाराष्ट्रात प्रचार सभांचा धुराळा पाहायला मिळणार आहे.

पंतप्रधान मोदी ३ दिवसांत महाराष्ट्रात तब्बल ७ सभा घेणार आहेत. महायुतीने २७, २९ आणि ३० एप्रिल रोजी राज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या सभा घेण्याचं नियोजन केलं आहे. २७ एप्रिलला मोदी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ कोल्हापुरात जाहीर सभा घेणार आहेत.

तर २९ एप्रिलला सोलापूर, सातारा आणि पुणे मतदारसंघात मोदींच्या सभा होणार आहेत. याशिवाय ३० एप्रिल रोजी मोदी सोलापूर, धाराशिव आणि लातूर लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ सभा घेणार असल्याची माहिती आहे.

या सभांमध्ये मोदी नेमकं काय बोलणार, मतदारांना आपल्याकडे खेचून आणण्यासाठी कोणती गॅरंटी देणार, याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. दुसरीकडे मोदींच्या सभांना उत्तर देण्यासाठी महाविकास आघाडीकडून देखील सभांचं आयोजन करण्यात आलं आहे.

आज सोलापूर आणि अमरावती लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते राहुल गांधी सभा घेणार आहेत. दुसरीकडे उद्धव ठाकरे हिंगोली आणि नांदेडमध्ये आज प्रचारसभा घेत आहे. तर पुण्यातही पंतप्रधान मोदी यांच्या सभेनंतर महाविकास आघाडीने सभा घेण्याचं नियोजन केलं आहे. मात्र, त्यांच्या सभेला अद्यापही पोलिसांनी परवानगी दिलेली नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime: भररस्त्यात भाजप कार्यकर्त्याची हत्या, ९ गोळ्या झाडत जागीच संपवलं; पुणे हादरले

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचे ₹१५०० बंद होणार, ई-केवायसीबाबत सरकारने दिली महत्वाची अपडेट

राज्यातील ५९ RTOऑफिसची १ मेपासून विशेष तपासणी मोहीम; नियम मोडणाऱ्या रिक्षा-टॅक्सी चालकांवर होणार कडक कारवाई

आपच्या खासदारानंतर आता 'या' राज्यातील अख्खा पक्षच भाजपमध्ये विलीन होणार? राजकीय वर्तुळात खळबळ

Weight Loss Foods: डाएटमध्येही खाऊ शकता हे ७ स्ट्रीट फूड, वजनावर काहीच होणार नाही परिणाम

SCROLL FOR NEXT