PM Narendra Modi on Rahul Gandhi  Saam TV
लोकसभा २०२४

Narendra Modi: आम्ही 'शक्ती'विरोधात लढतोय, राहुल गांधींच्या वक्तव्यावर PM मोदी संतापले; भर सभेतून दिला इशारा

PM Narendra Modi News: माझ्यासाठी प्रत्येक आई आणि मुलगी शक्तीचे रुप असून मी त्यांची शक्ती म्हणून पूजा करतो. मी भारतमातेचा उपासक आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

Satish Daud

PM Narendra Modi on Rahul Gandhi

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेची रविवारी (ता. १७) मुंबईत सांगता झाली. यावेळी शिवाजी पार्क मैदानावर झालेल्या सभेतून त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. आमची लढाई भाजपा किंवा कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात नाही. हिंदू धर्मात 'शक्ती' शब्द आहे, या शक्तीविरोधात आम्ही लढतोय, असं विधान राहुल गांधी यांनी केलं. त्यांच्या या विधानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संताप व्यक्त केला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज तेलंगणा दौऱ्यावर असून त्यांनी जगतियाल येथे जंगी सभा घेत शक्तिप्रदर्शन केलं. यानंतर उपस्थितांना संबोधित करताना त्यांनी इंडिया आघाडीवर जोरदार हल्लाबोल केला. माझ्यासाठी प्रत्येक आई आणि मुलगी शक्तीचे रुप असून मी त्यांची शक्ती म्हणून पूजा करतो. मी भारतमातेचा उपासक आहे, असं पंतप्रधान मोदी यांनी म्हटलं आहे.

राहुल गांधी (Rahul Gandhi) याचं आव्हान मी स्वीकारले असून या शक्तीस्वरूप माता-भगिनींच्या रक्षणासाठी मी माझे संपूर्ण आयुष्य घालवणार असून वेळ पडली तर जीवही धोक्यात घालेन, असं खुलं आव्हान देखील मोदी यांनी राहुल गांधी यांना भर सभेत दिलं.

एका बाजूला शक्तीचा नाश करणारे लोक आहेत, तर दुसऱ्या बाजूला शक्तीची पूजा करणारे लोक आहेत. शक्तीचा नाश कोण करू शकतो आणि शक्तीचा आशीर्वाद कोणाला मिळू शकतो याची हे ४ जूनला सर्वांना कळेल, असंही पंतप्रधान मोदींनी (Narendra Modi) भर सभेतून ठणकावून सांगितलं आहे.

काँग्रेसने तेलंगणाच्या स्वप्नांचा चुराडा केला, तर बीआरएसने लोकांच्या विश्वासाचा गैरवापर केला. तेलंगणातील जनतेला तब्बल १० वर्षे बीआरएसने निर्दयपणे लुटलं असल्याचा आरोपही मोदींनी केला. काँग्रेसने तेलंगणाला आपले 'पर्सनल एटीएम' बनवले असून ते लोकांच्या कष्टाने कमावलेल्या पैशाचा वापर आपल्या फूट पाडणाऱ्या धोरणांसाठी करते, असंही मोदी म्हणाले.

राहुल गांधी काय म्हणाले होते?

मुंबईतील शिवाजी पार्क येथे झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेतून राहुल गांधींनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. आम्ही सर्व मोदींविरोधात लढत आहोत, असं म्हटलं जातंय. पण, आमची लढाई एकाही व्यक्तीच्या विरोधात नसून, हिंदू धर्मात शक्ती शब्द आहे. आम्ही या शक्तीविरोधात लढत आहोत, असं राहुल गांधी यांनी म्हटलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : पुण्यात शिवसेना आणि पतित पावन संघटनेची होणार युती

Monday Horoscope: पैशाची महत्वाची कामं पार पडतील, शिव उपासना लाभाची ठरेल; वाचा राशीभविष्य

Maharashtra Politics: ठाकरे कुटुंबियांची सुरक्षा धोक्यात? मातोश्री'बाहेर ड्रोनच्या घिरट्या

धक्कादायक! 300 प्रवाशांना घेऊन जाणारे जहाज समुद्रात बुडाले, शेकडो बेपत्ता

Forest Department Fails To Control Leopard: बिबट्याची दहशत, प्रशासनाचं अपयश, स्वरक्षणासाठी गळ्यात खिळ्यांचे पट्टे

SCROLL FOR NEXT