PM Narendra Modi  Saam Digital
लोकसभा २०२४

PM Narendra Modi : प्रफुल पटेलांनी PM नरेंद्र मोदींचा जिरेटोप देऊन केला सत्कार; नव्या वादाला फुटलं तोडं

Chatrapati Shivaji Maharaj Jiretop : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीतून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रफुल पटेल यांनी त्यांचं जिरेटोप घालून स्वागत केलं, त्यामुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

Sandeep Gawade

वाराणसीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल पटेल यांनी जिरेटोप घालून त्यांचं स्वागत केलं. यानंतर आता विविध स्तरातून टीकेची झोड उठली आहे. अखिल ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे यांनी आता याप्रकरणी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिरेटोप घालण्याचं प्रफुल्ल पटेल यांचं धाडस कसं झालं. उद्या पंतप्रधान जर रायगडावर गेले तर त्यांना तिथल्या सिंहासनावर सुद्धा बसवणार का? असा संतप्त सवाल आनंद दवे यांनी केला आहे.

संभाजी ब्रिगेडनेही यावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. कोणत्याही कपड्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरेटोप घालणं ही न शोभणारी गोष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी छत्रपती नाहीत, हे प्रफुल पटेल यांना समजलं पाहिजे, छत्रपतींचा जिरेटोप कधी घातला जातो याची जाण पाहिजे, असं संभाजी ब्रिगेडचे संतोष शिंदे यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान मोदींनी आज वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशातील वाराणसी येथे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासहर NDAच्या नेत्यांची भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गटाचे नेते प्रफुल पटेल उपस्थित होते. यावेळी त्यांनी प्रफुल पटेल यांनी नरेंद्र मोदींचा जिरेटोप घालून सत्कार केला. त्यामुळे सर्व स्तरातून टीकेची झोड उठली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाशिक शहरातील इंदिरानगर बोगदा, मुंबई नाका, द्वारका परिसरात मोठी वाहतूक कोंडी

Surya Gochar 2026: शत्रूच्या राशीत सूर्याचा प्रवेश, २०२६मध्ये ४ राशींची पैशांची तंगी होणार दूर, मिळेल घवघवीत यश

The Family Man 3: 'द फॅमिली मॅन सीझन ३'साठी मनोज वाजपेयीसह बाकी कलाकारांना किती मिळालं मानधन?

Switch Board Cleaning Tips: घरातला स्विच बोर्ड काळकुट्ट झालाय? असा करा घरच्याघरी साफ, दिसेल पांढराशुभ्र

धनंजय मुंडे काय स्टारपणा दाखवेल? आमच्याकडे त्यांना 'नो एंट्री', राष्ट्रवादीमधील अंतर्गत कलह चव्हाट्यावर|VIDEO

SCROLL FOR NEXT