nitesh rane criticize sanjay raut on sangli constituency lok sabha election 2024 saam tv
लोकसभा २०२४

Nitesh Rane: सांगली काॅंग्रेस उद्धव ठाकरेंपुढे झुकणार नाही, संजय राऊतांचा ताेंडदेखला दाैरा: नितेश राणे

आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी स्पष्ट कबुली दिली की महाविकास आघाडीत वसुली होते. आज त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे असेही नितेश राणेंनी नमूद केले.

Siddharth Latkar

- विनायक वंजारे

Sindhudurg News :

निवडणूका म्हणजे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) व कंपनीचा धंदा आहे. तिकीट (उमेदवारी) विक्रीचा त्यांचा हा धंदा जूनाच आहे. सांगलीमध्ये व्यवहार करण्यासाठीच खासदार संजय राऊत (sanjay raut in sangli) हे गेल्याचा गंभीर आराेप भाजप आमदार नितेश राणे (nitesh rane) यांनी ठाकरे व राऊत यांच्यावर केला. दरम्यान राणे म्हणाले संजय राऊत यांनी माध्यमांशी बाेलताना म्हटले वसूली करणा-यांना भाजपने (bjp) घेतलं आहे. याचा अर्थ असा हाेताे महाविकास आघाडी (mahavikas aghadi) वसुली सरकार हाेते आणि आज त्यांनी यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. (Maharashtra Lok Sabha Election News in Marathi)

खासदार संजय राऊत हे आज सांगली दौऱ्यावर आहेत. त्यावर नितेश राणे म्हणाले उद्धव ठाकरेंनी जाहीर केलेल्या उमेदवाराच्या प्रचारासाठी ते सांगलीला आहेत असे चित्र दाखविले जात आहे. पुण्यातून काॅंग्रेसच्या एका नेत्याने मला फाेन केला. ते म्हणाले सांगलीच्या लोकसभेसाठी चंद्रहार पाटील (Chandrahar Patil) यांची उमेदवारी मागे घेतो आम्हाला 100 कोटी द्या असा प्रस्ताव मातोश्री वरून आला आहे अशी माहिती मला मिळाली आहे असेही राणेंनी नमूद केले. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

राणे पुढं बाेलताना म्हणाले संजय राऊत काँग्रेसला झुकविण्यासाठी सांगलीला गेलेत. हे खरं आहे की खोट याची माहिती राऊत व उद्धव ठाकरेंनी द्यावी. परंतु काॅंग्रेस त्यांना जुमानणार नाही हे त्यांच्या लक्षात आलं आहे. निवडणूक हे उद्धव ठाकरे व कंपनीचा धंदा आहे. त्यांचा तिकीट विक्रीचा धंदा आहे असा गंभीर आराेप राणेंना केला.

दरम्यान आजच्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी स्पष्ट कबुली दिली की महाविकास आघाडीत वसुली होते. आज त्यांनी त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे असेही नितेश राणेंनी नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! आठव्या वेतन आयोगाबाबत डेडलाइन वाढली; आजच करा हे काम

Stylish Blouse Designs : साडी, लेहेंगा अन् स्कर्ट; एकाच ब्लाउजचे अनेक लूक्स, पाहा ट्रेंडी डिझाइन्स

Maharashtra News Live Update: गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीवरून राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद टोकाला

Nashik TCS Case : लैंगिक शोषण अन् अश्लील टोमणे...; नाशिकच्या TCS धर्मांतर प्रकरणात २० तरुणींनी सांगितली आपबीती

Chanakya Niti Tips: 'या' 4 ठिकाणी दान केल्यास व्हाल मालामाल, चाणक्यांनी सांगितले झटपट श्रीमंत होण्याचे मार्ग

SCROLL FOR NEXT