Amol Kolhe On Ajit pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Amol Kolhe On Ajit Pawar: चोरलेली गोष्ट कोण अभिमानानं मिरवतं का?, अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल

Amol Kokhe Criticized Deputy CM Ajit Pawar: 'चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवत का? आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का?', असा थेट सवाल अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे.

रोहिदास गाडगे

१० महिन्यांनी पुन्हा एकदा पक्षफुटी आणि चिन्ह गेल्याच्या गोष्टीचा पुनरुच्चार करत महाविकास आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धारेवर धरलं आहे. 'चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवत का? आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का?', असा थेट सवाल अमोल कोल्हेंनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केला आहे. याद्वारे अमोल कोल्हे यांनी स्वाभिमान आणि पक्षनिष्ठा यांचा वस्तुपाठ ग्रामस्थांना दाखवून दिला.

अमोल कोल्हे यांनी आज आंबेगाव शिरुर तालुक्यातील गावभेट दौऱ्यावर आहेत. त्यावेळी करंदी गावात मोठ्या जल्लोषात त्यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार अशोक पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रस शरदचंद्र पवार गटाचे पदाधिकारी आणि बैलगाडा संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी भाषण करताना अमोल कोल्हे यांनी महायुतीच्या सर्वच नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. 'माननीय मुख्यमंत्री महोदय दोन वेळा, नागपूरकर मुख्यमंत्री दोन वेळा मतदारसंघात आले.' असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. तर, 'बारामतीकर उपमुख्यमंत्री सात-आठ वेळा शिरूर मतदारसंघात आले. भाजपचे मंत्री, शिंदे सेनेचे मंत्री हे दोन-दोन वेळा मतदारसंघात येऊन गेले. एवढे सगळे मंत्री येऊन गेले. आता उद्या प्रचारात केंद्रीय मंत्री ही येतील.'

तसंच, 'पण माझ्या सर्वसामान्य मतदाराला कळतंय. एवढे सगळे मंत्री, मुख्यमंत्री एका सामान्य शेतकऱ्याच्या पोराला घेरायला येत असतील तर ही ताकद एकट्या अमोल कोल्हेची नाही. तर सर्वसामान्य जनतेची ताकद आहे.' असे अमोल कोल्हे यांनी सांगितले. या दौऱ्यादरम्यान अमोल कोल्हे यांनी पुन्हा एकदा पक्षचिन्ह आणि पक्षफुटीच्या मुद्द्यावरून अजित पवारांवर निशाणा साधला. 'चोरलेली गोष्ट कोण अभिमानाने मिरवत का? आणि चोरलेल्या गोष्टीवर कोणी विश्वास ठेवत का?', असा सवाल करत त्यांनी अजित पवारांना टोला लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: मुख्यमंत्र्यांचे शिवसेना उमेदवार, प्रवक्ते आणि नेते पदाधिकाऱ्यांना पत्र

Soyabean Price : सोयाबीनच्या आर्द्रतेची मर्यादा वाढवली; शेतकऱ्यांना होणार फायदा

Tulsi Plant: तुळशीचे रोप हिवाळ्यात सुकत असेल तर करा 'या' ५ टिप्स फॉलो

Maharashtra Politics: शरद पवारांना मी सोडलं नाही.., अजित पवारांचे बारामतीत मोठं विधान

Ahilyanagar News : जम्मू- काश्मीरमधील ९ जण ताब्यात; बनावट बंदूक परवाना घेत करायचे सुरक्षा रक्षकाची नोकरी

SCROLL FOR NEXT