Loksabha Election 2024:  Saamtv
लोकसभा २०२४

Nashik News: 'कांद्यावर बोला', PM मोदींच्या सभेत गोंधळ घालणारा तरुण कोण? मोठी माहिती समोर

Loksabha Election 2024: कांद्यावरुन बोला, असे म्हणत किरण सानप या युवकाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. १६ मे २०२४

नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेदरम्यान एका तरुणाने गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला होता. याप्रकरणी किरण सानप या तरुणाला ताब्यात घेण्यात आले होते. याबाबत आता महत्वाची माहिती समोर आली असून किरण सानप हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, १५ मे रोजी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे तसेच भारती पवार यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पिंपळगावमध्ये सभा झाली. या सभेत पंतप्रधान मोदींचे भाषण सुरू असतानाच एका तरुणाने गोंधळ घातल्याचा प्रकार समोर आला. कांद्यावरुन बोला, असे म्हणत किरण सानप या युवकाने जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले होते.

सभेमध्ये गोंधळ घालणारा किरण सानप हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचा कार्यकर्ता असल्याचे समोर आले आहे. किरण सानप हा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा आयटी सेलचा पदाधिकारी आहे. तसेच तो गेल्या अनेक वर्षांपासून शेतकरी चळवळीत काम करत असल्याचेही स्पष्ट झाले आहे. या प्रकारामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

शरद पवारांची प्रतिक्रिया..

दरम्यान, याबाबत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देताना मोदी सरकारवर निशाणा साधला. नाशिक, साताऱ्यासह अन्य भागात कांद्याचा मुद्दा आहेच. शेतकरी कांद्यामुळे अस्वस्थ आहे. त्याचा फटका भारतीय जनता पक्षाला बसणार आहे, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: रामदास कदम यांच्या वक्तव्याचा रोह्यात राष्ट्रवादी काँग्रेसकडून जाहीर निषेध; रायगडमध्ये आंदोलनाचा इशारा

APMC Market Rates : राजापुरी सेलम हळदीला सोन्याचा भाव! दिवाळी पाडव्याला मिळाला तब्बल ६५ हजारांचा विक्रमी दर

Pune Crime: लोणी काळभोरमध्ये माजी सरपंचाची गुंडगिरी! हॉटेलमध्ये घुसून मालकासह कामगारांना बेदम मारहाण

Custard Apple : लांबसडक अन् घनदाट केसांसाठी सीताफळ फायदेशीर, 'असा' करा वापर

Health Tips : किती वर्षे दारू पिल्यानंतर लिवर खराब होतं? डॉक्टरांचा खुलासा वाचून आजच प्यायची बंद कराल

SCROLL FOR NEXT