Devendra Fadnavis And Rohit Pawar Saam TV
लोकसभा २०२४

Rohit Pawar News: भाजप, शिंदे गट अन् राष्ट्रवादी, महायुतीत कोण किती जागा जिंकणार? रोहित पवारांनी नेमका आकडा सांगितला!

Maharashtra Loksabha Election 2024: लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार? याबाबत वेगवेगळे अंदाज राजकीय नेते वर्तवत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबात महत्वाचे विधान केले आहे.

अभिजीत सोनावणे

नाशिक, ता. १४ मे २०२४

देशासह राज्यभरात सध्या लोकसभा निवडणुकीचे धुमशान सुरू आहे. लोकसभेत देशात ४०० पार अन् राज्यात ४५ प्लसचे ध्येय घेऊन मैदानात उतरलेल्या भाजप, महायुतीच्या नेत्यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. लोकसभा निवडणुकीत कोणाला किती जागा मिळणार? याबाबत वेगवेगळे अंदाज राजकीय नेते वर्तवत आहेत. अशातच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी याबाबात महत्वाचे विधान केले आहे.

काय म्हणाले रोहित पवार?

"महायुतीकडून मोठ्या प्रमाणात पैसे आणि गुंडागर्दीचा वापर सुरू आहे. मात्र पक्ष आणि कुटुंब फोडल्यामुळे भाजपाचाच मतदार पक्षावर नाराज आहे. देवेंद्र फडणवीस आणि इतर नेत्यांनी राजकीय पातळी खाली आणली त्यामुळे सामान्य नागरिक नाराज आहे. भाजपाचे मतदार बाहेर निघत नाहीयेत," असा टोला रोहित पवार यांनी लगावला.

महायुतीला किती जागा?

तसेच "भाजपाचा मतदार बाहेर न आल्याने याचा फायदा महाविकास आघाडीला फायदा होईल, असे म्हणत भाजपला १३ ते १४, शिंदे गटाला २ ते ३ जागा आणि अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही तसेच एकूण महायुतीला १६ ते १७ जागा मिळतील, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

दरम्यान, "सत्ताधाऱ्यांकडून 2 हजार कोटी रुपये या निवडणुकीत लोकांना वाटण्यात येणार आहेत असा आम्हाला अंदाज आहे. लोकांना विचारले तर ते सांगत आहेत पैसे महायुतीच्या लोकांकडून आलेत. बारामती आणि नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर करण्यात आला. पण पैशांचे वापर केला तरी काही उपयोग होणार नाही," अशी टीकाही रोहित पवार यांनी यावेळी केली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: खासदार ओमराजे निंबाळकर धाराशिवला जाणार

Digital Pyament Alert : डिजिटल पेमेंट करण्यापूर्वी १० महत्त्वाच्या गोष्टी डोक्यात ठेवा, नाहीतर...

खासदार आष्टीकरांच्या खास माणसाचा सुषमा अंधारेंना फोन; कॉलवर नेमकं काय बोलणं झालं? VIDEO

फक्त इडली-डोसा नाही! यंदा पावसाळ्यात ट्राय करा 'हे' 5 गरमागरम साऊथ इंडियन पदार्थ

Gingee Fort : जिंजी किल्ला पाहायला जाताय? मग जवळच असलेली ‘ही’ ५ स्वर्गाहून सुंदर हिल स्टेशन्स नक्की फिरा

SCROLL FOR NEXT