Nandurbar Lok Sabha Election Result Saam Digital
लोकसभा २०२४

Nandurbar Lok Sabha Election Result : काँग्रेसने नंदुरबारचा बालेकिल्ला पुन्हा मिळवला; भाजपच्या हिना गावित यांचा गोवाल पाडवी यांनी केला दारून पराभव

Maharashtra Election 2024 Result: नंदुरबार लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी यांचा मोठ्या मताधिक्यांनी विजय झाला आहे. तर भाजपच्या हिना गावित यांचा दारून पराभव झाला आहे.

Sandeep Gawade

काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या नंदुरबारमध्ये काँग्रेस उमेदवार गोवाल पाडवी आणि भाजपच्या हिना गावित यांच्या चुरशीची लढत पाहयला मिळाली होती. अखेर ॲड गोवाल पाडवी यांचा मोठा विजय झाला असून भाजपच्या उमेदवार हिना गावित यांचा त्यांनी 159120 मतांनी दारून पराभव केला आहे. गोवाल पाडवी यांना 745998 मतं मिळाली तर हिना गावित यांना 586878 मतं मिळाली आहेत.

काँग्रेस उमेदवार पाडवी विजय झाल्यानंतर पहिली प्रतिक्रिया SAAM टीव्ही वरला दिली आहे. "विजयाचा विश्वास पहिल्या दिवसांपासून होता. देशात बदल हवा होता याची सुरुवात नंदुरबार पासून झाली आहे. देशात देखील आता काँग्रेसचे सरकार येणार असल्याचा विश्वास नवीन खासदार गोवाल यांनी व्यक्त केला. मणिपूर, संविधान बदल, या मुद्द्यांचा फायदा झाल्यांच त्यांनी म्हटलं आहे.

नंदुरबार लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र मोदी लाटेत मागच्या दोन्ही लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजय झाला होता. स्वातंत्र्यानंतर 2009 पर्यंत नंदुरबार लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार सातत्याने विजयी होत आले आहेत. आता गोवाल पाडवी यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला पुन्हा मिळवला आहे.

माणिकराव गावित यांनी 1981 ते 2009 या काळात सलग 9 वेळा लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. 2014 आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या हिना गावित यांनी नंदुरबार लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवला होता. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत हीना गावित यांनी माणिकराव गावित यांचा पराभव केला होता. माणिकराव गावित यांचा १ लाख ५० हजार मतांनी पराभव केला होता. हिना गावित यांना 5,79,486 मते मिळाली, तर माणिकराव गावित यांना 4,72,581 मते मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: ठाकरे गटाला मोठा धक्का, गुहागरमधील नेत्या शिवसेनेत प्रवेश करणार

Malshej Ghat Kalu Waterfall Tragedy : मुसळधार पावसामुळे नदीला अचानक पूर, ३०० पर्यटक अडकले; सुटकेचा थरार कॅमेऱ्यात कैद, VIDEO

Biscuits Side Effects: तुम्हालाही बिस्कीट खायला आवडतं? पण होतात 'हे' गंभीर परिणाम, एकदा वाचाच

Mansa Devi Temple: शॉर्ट सर्किटची अफवा; अरुंद पायऱ्या आणि फक्त एकच रस्ता, मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी ; थरकाप उडवणारा Video Viral

Rakshabandhan 2025: वास्तुशास्त्रानुसार, रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीला 'या' भेटवस्तू देऊ नका

SCROLL FOR NEXT