Maval Lok Sabha Constituency Saam TV
लोकसभा २०२४

Maval Lok Sabha: शिंदे गटाचं टेन्शन मिटलं, मावळ लोकसभेसाठी महायुतीची एकजूट; श्रीरंग बारणे हॅट्ट्रिक करणार का?

Maval Politics News: शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे पुन्हा मावळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या विजयासाठी आम्ही एकजुटीने काम करणार, असं महायुतीतील नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.

Satish Daud

दिलीप कांबळे, साम टीव्ही मावळ

Maval Lok Sabha Constituency

मावळ लोकसभेच्या जागेवरून महायुतीतील तिन्ही पक्षात जोरदार रस्सीखेच सुरू होती. मात्र, ही जागा शिवसेना शिंदे गटाच्या वाट्याला आली. शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे पुन्हा मावळमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. त्यांच्या विजयासाठी आम्ही एकजुटीने काम करणार, असं महायुतीतील नेत्यांनी स्पष्ट केलं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यामुळे शिवसेना शिंदे गटाचं टेन्शन काहीसं मिटलं आहे. मावळ लोकसभा मतदारसंघ (Lok Sabha Election 2024) हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. परंतु शिवसेनातील अभूतपूर्व फुटीनंतर मावळमध्ये ठाकरे आणि शिंदे असे दोन गट पडले आहेत. ठाकरे गटाने मावळमधून संजोग वाघेरे यांना उमेदवारी दिली आहे.

त्यामुळे आता मावळ लोकसभा मतदारसंघांमध्ये ठाकरे विरुद्ध शिंदे असा सामना रंगणार आहे. सुरुवातीला भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांनी मावळमधून विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध केला होता. त्यामुळे मावळ लोकसभेची जागा महायुतीतील कोणत्या पक्षाला मिळणार याची उत्सुकता अनेकांना होती.

मात्र, अजित पवारांनी मावळ लोकसभेची जागा ही शिवसेनेलाच सोडणार अशी भूमिका स्पष्ट केली. त्यानंतर मात्र महायुतीमधील नेत्यांनी नरमाईची भूमिका घेतली. श्रीरंग बारणे यांना सर्वाधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू, असं भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे आणि अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

गेल्या १० वर्षांपासून मावळ लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात आहे. श्रीरंग बारणे यांनी सलग दोन वेळा या मतदारसंघातून मोठा विजय मिळवला आहे. आता श्रीरंग बारणे हॅट्रिक करणार की ठाकरे गटाचे संजोग वाघेरे बाजी पलटणार? हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Famous Actress : ऑडिशनदरम्यान प्रायव्हेट व्हिडीओ बनवला, अडल्ट साइटवर टाकून..., प्रसिद्ध अभिनेत्रीने सांगितला थरारक अनुभव

Maharashtra News Live Update: दादांना आदरांजली वाहण्यासाठी आज मतदानासाठी यावं - सुप्रिया सुळे

आयपीएल स्पर्धेत मोठा ट्विस्ट; ऑरेंज कॅपच्या शर्यतीत वैभव सूर्यवंशीने विराट कोहलीला मागे टाकलं

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट; सरकारी कर्मचाऱ्यांकडून महत्त्वाची मागणी; वाचा सविस्तर

Akola : दाताने उचललं, गरागरा फिरवलं; चिमुकल्यांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या भोंदू चेतनविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT