Chhagan Bhujbal News Saam tv
लोकसभा २०२४

Loksabha Election: नाशिकमधून छगन भुजबळांची उमेदवारी निश्चित? 'कमळ' चिन्हावर लढण्याचा भाजपकडून प्रस्ताव; सूत्रांची माहिती

Nashik Loksabha Constituency News: साताऱ्याऐवजी सध्या शिंदे गटाकडे असलेल्या नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

अभिजीत सोनावणे

Maharashtra Politics News:

राज्यातील महायुतीमध्ये जागा वाटपावरुन धुसफूस सुरूच आहे. महायुतीमध्ये सातारा लोकसभेच्या जागेवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये रस्सीखेच सुरू होती. साताऱ्यातून उदयनराजे भोसले यांना घड्याळ चिन्हावर लढवण्यास अजित पवार गट आग्रही होता.

मात्र ही जागा भाजपकडेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अशातच आता साताऱ्याऐवजी सध्या शिंदे गटाकडे असलेल्या नाशिकमधून राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ लढणार असल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे.

(Maharashtra Loksabha Election 2024)

याबाबत अधिक माहिती अशी की ,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) हे महायुतीमधून लोकसभा लढवणार असल्याची शक्यता असून भुजबळ यांना नाशिक लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे. भुजबळ हे नाशिकमधून घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचे संकेत मिळत आहेत.

सातारा लोकसभेचा दावा सोडल्यानंतर नाशिकसाठी राष्ट्रवादी आग्रही असल्याचे सांगण्यात येत आहे. भारतीय जनता पक्षाने (BJP) छगन भुजबळ यांनी कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र अजित पवार यांनी भुजबळ पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याबाबत ठाम असल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत पुढील ४८ तासात निर्णय होणार आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

छगन भुजबळांची प्रतिक्रिया काय?

"नाशिकच्या जागेवर अजून बोलणी सुरू असून तीनही पक्ष चर्चा करत आहेत. नाशिकच्या जागेसाठी अनेक जण मुंबई जाऊन आलेत. चर्चेनंतर कुणीही उमेदवार ठरले तर आम्ही काम करणार आहे. भुजबळ कुटूंबातील व्यक्तीला उमेदवारी द्या असे मी सांगितले नाही. माझं नाव तर तुम्हीच चर्चेत आणले. फक्त शिंदे गटाला जेवढ्या जागा मिळतील तेवढ्या आम्हाला द्या अशी मी मागणी केली आहे," असे छगन भुजबळ म्हणालेत. (latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : संकुचित विचार मराठी माणसाला शोभत नाही; शिंदेंच्या जय गुजरात घोषणेवर फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर

WhatsApp Blue Tick : व्हॉट्सॲपवर ब्लू टिक मिळवणं झालं सोपं, जाणून घ्या भन्नाट माहिती

Sonakshi Sinha: सोनाक्षी सिन्हा गुडन्यूज देणार? का सुरू आहे अशी चर्चा

Jai Gujarat Row: शिंदेंच्या पक्षाची स्थापना सूरतमध्ये झाली; जय गुजरात’वरून संजय राऊतांचा घणाघात | VIDEO

Maharashtra Live News Update: चामर लेणी येथे झालेल्या ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

SCROLL FOR NEXT