Raj Thackeray Meet CM EKnath Shinde Devendra Fadanvis:  Saam tv news
लोकसभा २०२४

Loksabha Election 2024: महायुतीत जाण्यास मनसे नेते इच्छुक? राज ठाकरेंची शिंदे- फडणवीसांसोबत दीड तास खलबतं; भूमिकेकडे लक्ष!

Raj Thackeray Meet CM EKnath Shinde Devendra Fadanvis: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये घेण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंची बैठक झाली.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Maharashtra Politics News:

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला महायुतीमध्ये घेण्यासाठी राजकीय घडामोडींना वेग आला आहे. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर आज (गुरूवार, २१ मार्च) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत राज ठाकरेंची बैठक झाली. तब्बल दिड तास चाललेल्या या बैठकीत युतीसंदर्भात महत्वाची चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे.

मनसे नेत्यांची शिवतिर्थावर बैठक!

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज मनसेची (MNS) शिवतीर्थावर बैठक पार पडली. दोन दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि केंद्रीय गृहमंत्री, भाजप नेते अमित शहा यांची दिल्लीत भेट झाली होती. त्या संदर्भात या बैठकीमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये बऱ्याच नेत्यांनी मनसेनं महायुतीसोबत आगामी लोकसभा निवडणूक लढवण्यास सकारात्मक प्रतिसाद दिल्याचे सांगण्यात येत आहे.

राज ठाकरेंची शिंदे फडणवीसांसोबत खलबतं

त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत वांद्रे येथील ताज लॅण्डसन हॉटेलमध्ये बैठक झाली. या बैठकीत मनसे- भाजप युतीबाबत चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. या युतीबाबत येत्या दोन- ३ दिवसात निर्णय होईल, असेही सांगण्यात येत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दरम्यान, अमित शहा यांनी राज ठाकरेंसोबत झालेल्या भेटीदरम्यान महायुतीच्या तिन्ही पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याटी अट ठेवली होती. परंतू मनसेकडून नकार देण्यात आल्याचे बोलले जात आहे. आजच्या भेटीनंतर राज ठाकरे यांची मनसे पदाधिकाऱ्यांसोबत पुन्हा बैठक होत आहे. या बैठकीत राज ठाकरे महायुतीबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nanded Flood: नांदेडमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने जनजीवन विस्कळीत, रस्ते जलमय|VIDEO

Danny Pandit Viral Video: अथर्व सुदामेनंतर प्रसिद्ध इनफ्ल्युएन्सर डॅनी पंडितच्या रीलची चर्चा; नेटकरी म्हणाले, हा आहे माझा भारत देश

Manoj Jarange Patil Protest Live Updates : मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला एक तास बाकी

Maharashtra Live News Update: गणेशोत्सवात दूध उत्पादकांना गोकुळकडून खास भेट

LIC पॉलिसीधारकांसाठी इशारा! या छोट्या चुकीमुळे होऊ शकतो मोठा तोटा

SCROLL FOR NEXT