Unmesh Patil Join Thackeray Group:  Saamtv
लोकसभा २०२४

Unmesh Patil News: उद्धव ठाकरेंचा भाजपला दे धक्का; खासदार उन्मेष पाटलांनी बांधले शिवबंधन

Maharashtra Politics News: जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला.

Gangappa Pujari

गिरीश कांबळे, मुंबई|ता. ३ एप्रिल २०२४

Unmesh Patil Join Thackeray Group:

जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला. भारतीय जनता पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर उन्मेष पाटील हे नाराज होते. त्यांच्यासोबत पारोळ्याचे भाजपचे माजी नगराध्यक्ष करण पवार यांच्यासह अनेक भाजप पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केला असून भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

जळगावचे भाजपचे विद्यमान खासदार उन्मेष पाटील यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधून ठाकरे गटात प्रवेश केला. शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), खासदार संजय राऊत आदी नेते यावेळी उपस्थित होते. उन्मेष पाटलांच्या पक्षप्रवेश हा जळगावमध्ये भाजपसाठी मोठा धक्का मानला जात असून भाजपची लोकसभेची गणितं यामुळे बिघडणार आहेत.

सध्या जळगाव जिल्ह्यात महाविकास आघाडीचा (Mahavikas Aaghadi) एकही विद्यमान आमदार नाहीये. तसंच ठाकरेचे जे तीन आमदार होते, ते सर्व शिंदे गटात असल्याने ही लोकसभेची लढत रंगतदार होणार आहे. तत्पुर्वी, उन्मेष पाटील यांनी आपल्या खासदारकीचा राजीनामाही भाजप पक्षश्रेष्ठींकडे पाठवला आहे.

जळगावमधून लोकसभा लढणार?

दरम्यान, ठाकरे गटात प्रवेश केल्यानंतर उन्मेष पाटील यांना शिवसेना ठाकरे गटाकडून जळगाव लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तिकीट किंवा खासदार होण्यासाठी नाही तर स्वाभिमानासाठी ठाकरे गटात प्रवेश केला असल्याची पहिली प्रतिक्रिया उन्मेष पाटील यांनी दिली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनीही उन्मेष पाटील यांना उमेदवारी मिळणार असल्याचे संकेत दिले आहेत.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Almond Milk: बदामाचे दूध प्यायल्यास काय होते?

Health: घसादुखीमुळे होऊ शकतात ५ धोकादायक आजार, चुकूनही दुर्लक्ष करु नका, अन्यथा...

ITBP Recruitment: १२ वी पास तरुणांना ITBP मध्ये नोकरीची सुवर्णसंधी, महिना ९२००० रुपये पगार, अर्ज कसा करावा?

Astro Tips: हातात घड्याळ घालताय? या चुका टाळा अन्यथा...

'ये तुम्हारे कर्मों का फल है...'चाहत अन् रजतमध्ये कडाक्याचे भांडण 'Bigg Boss' मध्ये मोठा ड्रामा, पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT