Mahayuti  Saam TV
लोकसभा २०२४

Loksabha Election: नाशिकवरुन महायुतीत कलह संपेना! भाजप पुन्हा आक्रमक; पदाधिकारी देणार सामूहिक राजीनामा

Maharashtra Politics News: नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमधील वाद काही मिटत नसल्याची चिन्हे दिसत आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही या जागेवर ठाम आहेत.

अभिजीत सोनावणे

Nashik Loksabha Constituency News:

नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमधील वाद काही मिटत नसल्याची चिन्हे दिसत आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाकडे असलेल्या या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दावा केला आहे. तर भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्तेही या जागेवर ठाम आहेत. त्यामुळेच महायुतीमधील तिन्ही पक्षांमध्ये वाद पाहायला मिळत असून आता भाजप कार्यकर्त्यांनी थेट राजीनाम्याचे अस्त्र उचलले आहे. (Maharashtra Loksabha Election 2024)

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे नाशिक लोकसभेची पुन्हा उमेदवारी मिळवण्यावर ठाम आहेत. चार दिवसांपूर्वी त्यांनी मुंबईमध्ये मोठे शक्तीप्रदर्शनही केले होते. मात्र साताऱ्याची जागा भाजपला सोडल्यानंतर ही जागा छगन भुजबळ यांनी लढवावी, अशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मागणी आहे. अशातच हेमंत गोडसे आणि छगन भुजबळ यांच्या नावाला विरोध करत भाजप नेत्यांनीही या जागेवर दावा केला आहे.

नाशिक लोकसभेसाठी भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले असून पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनाम्याचे अस्त्र उचलले आहे. त्यानुसार नाशिक लोकसभा मतदारसंघातील २० पैकी १० ते १२ मंडल अध्यक्ष सामूहिक राजीनामा देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवरून महायुतीमधील तणाव वाढण्याची चिन्हं दिसत आहेत.

दरम्यान, शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे हे नाशिकच्या जागेवर पुन्हा लढवण्यास ठाम आहेत. यासाठी हेमंत गोडसे यांनी आज पुन्हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी हेमंत गोडसे यांच्यासोबत मंत्री दादा भुसे, सुहास कांदे आणि शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरीही होते. या भेटीनंतर हेमंत गोडसे यांनी १०० टक्के जागा मलाच मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: जळगावात पुन्हा भीषण अपघात टँकरच्या धडकेत आयटीआय विद्यार्थ्याचा मृत्यू; दोन जखमी

Sugar price hike: एका महिन्यात साखर तब्बल २९ टक्क्यांनी महागली, आता केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय; काय आहे नवा नियम?

Taj Mahal: ताजमहालच्या तळाशी 42 विहिरी का आहेत? काय आहे त्यांचं रहस्य?

Bollywood Actor : हृतिक रोशनशी व्हायची तुलना, प्रियंकासोबत केलंय काम! ओळखूही येत नाहीये 'हा' प्रसिद्ध अभिनेता, VIDEO तुफान व्हायरल

Idli- Dosa For Diabetes: डायबिटीजचे रूग्ण इडली, डोसा खाऊ शकतात का? जाणून घ्या ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहण्यासाठी काय खावे?

SCROLL FOR NEXT