Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : ...म्हणून अमोल किर्तीकरांच्या मागे ईडीची चौकशी; उद्धव ठाकरेंनी बोईसरच्या सभेत सांगितलं खरं कारण

Lok Sabha Election 2024 : अमोल किर्तीकर निवडून येणार म्हणून त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावली आहे, मात्र पीएम फंड आणि शिंदे गटाकडे ईडीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

Sandeep Gawade

Maharashtra Politics 2024

गजानन किर्तीकर यांनी गुरुवारी ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर याच्या ईडी चौकशीवरून नाराजी व्यक्त केली होती. त्यावरून आज उद्धव ठाकरे यांनीही भाजपवर जोरदार हल्ला चढवला. अमोल किर्तीकर निवडून येणार म्हणून त्यांच्यामागे ईडीची चौकशी लावली आहे, मात्र पीएम फंड आणि शिंदे गटाकडे ईडीने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

अमोल किर्तीकर यांना ठाकरे गटातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खिचडी घोटाळ्यावरून ईडीने समन्स बजावले आहेत. काल गजानन किर्तीकर यांनी याबाबत तिव्र नाराजी व्यक्त केली होती. दरम्यान आज बोईसरमध्ये उद्धव ठाकरेंची प्रचार सभा झाली. यावेळी त्यांनी अमोल किर्तीकरांच्या चौकशीवरून भाजपवर निशाणा साधला.

काल नांदेडमधून अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला नकली शिवसेना म्हटलं होतं. त्यावरही उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलं. नकली शिवसेना ही तुमची डिग्री आहे का?, असं म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या प्रचार सभेत उद्धव ठाकरे यांची शिवसेना नकली असल्याचं म्हटलं होतं, यावरच प्रत्युत्तर देताना पालघर येथील बोईसरमधील प्रचार सभेत ते असं म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदी यांना लक्ष्य करत उद्धव ठाकरे यावेळी सभेत बोलताना म्हणाले की, ''यापुढे मी जी टीका करणार आहे, ती पंतप्रधानांवर नाही, नरेंद्र मोदी यांच्यावर करणार आहे. कारण देशाच्या पंतप्रधानांचा मी अपमान करू शकत नाही. तुमचा महाराष्ट्राशी संबंध काय? तुम्ही महाराष्ट्राबाहेरील आहात. महाराष्ट्रात येऊन जी शिवसेना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी स्थापन केली, त्या शिवसेनेला तुम्ही नकली म्हणता. नकली म्हणायला ती तुमची डिग्री आहे का?''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir: 'डबल महाराष्ट्र केसरी' हर्षवर्धन सदगीरची कुस्ती स्पर्धेतून निवृत्ती; नेमकं कारण काय?

Weight Loss: फक्त २ गोष्टी दररोज करा २० किलो वजन कमी करणं होईल सहज शक्य, एका महिन्यात दिसेल फरक

Datta Meghe: भाजपचे ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांचं निधन, वर्ध्यामध्ये आज होणार अंत्यसंस्कार; राजकीय वर्तुळात शोककळा

Maharashtra Live News Update: वंचित बहुजन आघाडी-काँग्रेसच्या मोर्चाला पोलिसांची परवानगी नकार

Monday Horoscope: शांत डोक्याने महत्वाची कामे पूर्ण कराल, ५ राशींना मिळणार नव्या संधी; वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT