Maharashtra Politics 2024  Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : 'त्यांच्या ४८ नाही तर ४९ जागा येतील'; उद्धव ठाकरेंच्या दाव्यावर फडणवीसांचा खोचक टोला

Lok Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांनी केंद्रात यावेळी इंडिया आघाडीचं सरकार येत असून राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे.

Sandeep Gawade

उद्धव ठाकरे यांनी केंद्रात यावेळी इंडिया आघाडीचं सरकार येत असून राज्यातील लोकसभेच्या सर्वच्या सर्व ४८ जागा जिंकणार असल्याचा दावा केला होता. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केला आहे. उद्धव ठाकरे यांचं कर्तुत्व मोठं आहे, त्यामुळे त्यांच्या फक्त ४८ चं नाही तर ४९ जागा येतील असा खोचक टोला लगावला आहे.

महाराष्ट्रात २० मे रोजी लोकसभेचं शेवटच्या टप्प्यातील मतदान होणार आहे. राजधानीतील ६ जागा आणि इतर महत्त्वाच्या ७ जागांसाठी सर्वच पक्षांनी ताकद पणाला लावली आहे. त्यातचं उद्धव ठाकरे यांनी या निवडणुकीत इंडिया आघाडी बहुमतात येत आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी आता विश्रांती घ्यावी आणि आमच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीला यांवं, असं म्हणत डिवचलं आहे.

तसचं पत्रकार परिषदेत पत्रकारांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडी राज्यात ४६ जागा निवडून येतील असा दावा करत आहे, असा प्रश्न विचारला होता. त्यावर उद्धव ठाकरे यांनी थोडं दुरुस्त करतो असं म्हणत राज्यात महाविकास आघाडीच्या ४६ नाही तर ४८ जागा येतील, असा दावा केला. त्यावर एका सभेत देवेंद्र फडणवीस यांनी पलटवार करत उद्धव ठाकरे यांचं कर्तुत्व मोठं आहे. त्यांच्या ४८ नाही तर ४९ जागा येतील, आमच्या ४९ जागा काही येऊ शकत नाहीत, असा टोला लगावला.

20 मे रोजी महाराष्ट्रातील उर्वरित 13 जागांसाठी मतदान होणार असून आज प्रचाराचा शेवटचा दिवस होता. धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण मध्य आणि मुंबई दक्षिण या जागांसाठी मतदान होणार आहे.. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी विक्रोळी, दादर आणि भगतसिंग नगर येथे जाहीर सभांना संबोधित केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Care Tips : फक्त ५ मिनिटांचा उपाय! अ‍ॅलोवेरामुळे नखे होतील मजबूत

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

SCROLL FOR NEXT