Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : नवनीत राणांवर संजय राऊतांचं आक्षेपार्ह विधान; देवेंद्र फडणीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Lok Sabha Election 2024 : संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निषाणा साधला. ठाकरे सरकारच्या काळात नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा म्हटली म्हणून १२ दिवस जेलमध्ये राहिल्या.

Sandeep Gawade

संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. त्यावरून आज देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर निषाणा साधला. ठाकरे सरकारच्या काळात नवनीत राणा यांनी हनुमान चालिसा म्हटली म्हणून १२ दिवस जेलमध्ये राहिल्या. शिवसेना आणि कॉंग्रेसचे नेते अमरावतीत येवून नवनीत राणांविषयी आक्षेपार्ह विधानं करत आहेत. त्यांना अमरावतीच्या महिलाच जागा दाखवून देतील, असा टोला देवेंद्र पडणवीस यांनी शिवसेनेला लगावला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींची आज रामदास तडस आणि नवनीत राणांच्या प्रचारात वर्ध्यात सभा घेतली. वर्ध्यातल्या सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषण करताना काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था कधी पाहिली नव्हती असं म्हटलं आहे.

महात्मा गांधींनी सांगितलं होतं देशाला स्वातंत्र्य मिळालं आहे काँग्रेस पक्ष विसर्जित केला. काँग्रेसवाल्यांनी ऐकलं नाही. मात्र वर्धेकरांनी ऐकलं आणि काँग्रेस संपवायला सुरुवात केली. तरीही काँग्रेस वर्ध्यात शिल्लक होती. मात्र शरद पवारांनी वर्ध्यातून काँग्रेस पक्ष विसर्जित केला. वर्धा हे काँग्रेसमुक्त झालं आहे. काँग्रेसची इतकी केविलवाणी अवस्था यापूर्वी कधीही पाहिली नव्हती असा टोला फडणवीस यांनी लगावला.

मला विश्वास आहे की जनतेच्या आशीर्वादाने रामदास तडस हॅटट्रीक नक्की करतील. अमरावतीत नवनीत राणा उद्धव ठाकरेंच्या काळात हनुमान चालीसा म्हटली म्हणून १२ दिवस जेलमध्ये राहिल्या. त्यांच्याबद्दल अजूनही शिवसेनेचे नेते, काँग्रेसचे नेते येऊन आक्षेपार्ह उद्गार काढत आहेत मी आता ठामपणे सांगतो आमच्या महिलाच यांना उत्तर देतील. असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

8th Pay Commission: 2027 मध्ये सॅलरी वाढली तर 2026 च्या पैशांचं काय? 8व्या वेतन आयोगाबाबत महत्त्वाची अपडेट

Honey And Warm Water Benefits: कोमट पाण्यात मध मिक्स करून पिण्याचे फायदे काय?

SCROLL FOR NEXT