Maharashtra Politics 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Politics 2024 : आमदार म्हणताहेत, ''खासदार' झाल्यासारखं वाटतंय'; महाराष्ट्रात 13 आमदार लोकसभेच्या रिंगणात

Lok Sabha Election 2024 : यंदाची लोकसभेची निवडणूक विविध अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात एक-दोन नव्हे तब्बल 13 विद्यमान आमदार हे खासदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यातील दोन आमदार हे राज्याचे मंत्री आहेत.

Sandeep Gawade

यंदाची लोकसभेची निवडणूक विविध अंगांनी वैशिष्ट्यपूर्ण आहे. महाराष्ट्रात एक-दोन नव्हे तब्बल 13 विद्यमान आमदार हे खासदार होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत. त्यातील दोन आमदार हे राज्याचे मंत्री आहेत. पाहूया एक खास रिपोर्ट.

खरतर आमदारकीचा थाट काही औरच असतो. तालुक्यात आमदार महोदय म्हणून मोठा रुबाब असतो. स्थानिक राजकारणात दबदबा असतो. त्यामुळे अनेकजण दिल्लीत जाण्यासाठी नाखूष असतात. यंदाची लोकसभा निवडणूक मात्र त्याला अपवाद ठरली आहे. महाराष्ट्रात तब्बल 13 विद्यमान आमदार हे खासदार होण्यासाठी निवडणूक लढवतायेत. त्यातील दोन आमदार राज्याचे मंत्री आहेत. तर एक आमदार विधान परिषद सदस्य आहेत. या आमदारांना आता खासदारकीचे वेध लागले असून, संसद प्रवेशाच्या ते प्रतीक्षेत आहेत.

कोणते आमदार खासदारकीची स्वप्नं पाहतायेत? ते पाहूया

नागपूर लोकसभेसाठी काँग्रेसकडून विकास ठाकरे मैदानात आहेत. ते नागपूर पश्चिमचे आमदार आहेत.

चंद्रपूर लोकसभा

2 सुधीर मुनगंटीवार - भाजप (महायुती)

आमदार - बल्लारपूर विधानसभा मतदारसंघ

3 - प्रतिभा धानोरकर - काँग्रेस (मविआ)

आमदार - वरोरा विधानसभा मतदारसंघ

अमरावती लोकसभा

4 - बळवंत वानखेडे - काँग्रेस (मविआ)

आमदार - दर्यापूर विधानसभा मतदारसंघ

सोलापूर लोकसभा

5 राम सातपुते भाजप (महायुती)

आमदार - माळशिरस विधानसभा मतदारसंघ (माढा लोकसभा)

6 प्रणिती शिंदे- काँग्रेस (मविआ)

आमदार - सोलापूर शहर मध्य मतदारसंघ

सातारा लोकसभा

7 शशिकांत शिंदे - राष्ट्रवादी शरद पवार गट (मविआ)

आमदार - विधान परिषद

छ. संभाजीनगर लोकसभा

8 रोहयो मंत्री संदीपान भुमरे - शिवसेना शिंदे गट (महायुती)

आमदार - पैठण विधानसभा मतदारसंघ (जालना लोकसभा)

पुणे लोकसभा

9 रवींद्र धंगेकर - काँग्रेस (मविआ)

आमदार - कसबा पेठ विधानसभा मतदारसंघ

मुंबई दक्षिण लोकसभा

10 यामिनी जाधव - शिवसेना शिंदे गट (महायुती)

आमदार - भायखळा विधानसभा मतदारसंघ

मुंबई उत्तर मध्य लोकसभा

11 वर्षा गायकवाड - कॉंग्रेस (मविआ)

आमदार - धारावी विधानसभा मतदारसंघ

ईशान्य मुंबई लोकसभा

12 मिहिर कोटेचा - भाजप (महायुती)

आमदार - मुलुंड विधानसभा मतदारसंघ

वायव्य मुंबई लोकसभा

13 रवींद्र वायकर - शिवसेना शिंदे गट (महायुती)

आमदार - जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघ

लोकसभा निवडणुकीत पारनेरचे नीलेश लंके आणि उमरेडचे राजू पारवे हे दोन माजी आमदारही आपलं नशीब आजमावताहेत. नीलेश लंके दक्षिण नगरमधून तर राजू पारवे रामटेकमधून निवडणूक लढवतायेत. नीलेश लंके यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटात प्रवेश करण्यापूर्वी आणि राजू पारवे यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यापूर्वी आमदारपदाचा राजीनामा दिला आहे. या 13 पैकी किती आमदारांचं खासदारकीचं स्वप्न पूर्ण होणार आणि किती जणांचं भंग पावणार हे येत्या 4 जून रोजीच कळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Assembly: बारामतीचा पुतण्या पडणार? अजित पवार की युगेंद्र पवार? बारामतीकरांचा कौल कुणाला?

Assembly Election: बाळासाहेबांच्या पुण्यतिथीला पोस्टर वॉर; दोन्ही शिवसेनेचा एकमेकांवर प्रहार

Bigg Boss 18: करणवीर मेहराला डबल दणका; टॉप ५ मधून बाहेरही गेला अन् पावरही झाली गूल

Mob Attacks Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचार सभेदरम्यान राडा; थेट अंगावर फेकल्या खुर्च्या, नेमकं काय घडलं? VIDEO

पुष्पा भैय्याची क्रेझ! 'पुष्पा 2: द रूल' ट्रेलर इव्हेटमध्ये चाहत्यांनी सोडली लिमीट, कोणी चढलं टॉवरवर कोणी तोडलं बॅरिकेड

SCROLL FOR NEXT