Supriya Sule Leading Against Sunetra Pawar Saam TV
लोकसभा २०२४

Baramati Election 2024 Result: बारामतीत सुप्रिया सुळेंचे पारडे जड! सुनेत्रा पवार पिछाडीवर; कार्यकर्त्यांचा जल्लोष

Supriya Sule Leading Against Sunetra Pawar From Maharashtra's Baramati Lok Sabha Constituecy: अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुप्रिया सुळे यांनी मोठी आघाडी घेतली आहे.

Gangappa Pujari

बारामती, ता. ४ जून २०२४

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे सुरूवातीचे कल समोर येत आहेत. राज्यात अनेक ठिकाणी महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी मारल्याचे पाहायला मिळत आहे. अवघ्या राज्याचे लक्ष लागलेल्या बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांचाच वरचष्मा पाहायला मिळत आहे.

अवघ्या देशाचे लक्ष लागलेल्या बारामती लोकसभा मतदार संघात सुरूवातीचे कल समोर येत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या सुनेत्रा पवार यांच्यामध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. सुरूवातीच्या कलामध्ये सुप्रिया सुळे यांनी बाजी मारत मोठी आघाडी घेतली आहे.

निकालामध्ये सुप्रिया सुळे या आघाडीवर असल्याचे समजताच बारामतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयासमोर कार्यकर्त्यांनी फटाके फोडून जल्लोष साजरा केला आहे. यावेळी महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार, सुप्रिया सुळे तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है' अशा घोषणा देखील देण्यात आल्या.

बारामतीप्रमाणे साताऱ्यातही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना मोठा धक्का बसला असून शशिकांत शिंदे यांनी मोठी आघाडी घेतली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांनी पाचव्या फेरी अखेर २१ हजार मतांनी आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये पीक कर्ज देण्यास एसबीआय बँक आणि महाराष्ट्र ग्रामीण बँकेची टाळाटाळ

Night Walking : रात्रीच्या जेवणानंतर १० मिनिटे चालल्यास काय होते? ७ जबरदस्त फायदे वाचून तुम्हीही आजपासूनच कराल सुरुवात

Blast: केमिकलच्या कंपनीत भीषण स्फोट, ५ कामगारांचा होरपळून मृत्यू

Political News : भाजपच्या १६ नगरसेवकांविरोधात गुन्हा, पत्रकार आणि नागरिकांना मारहाण केल्याचा आरोप

Naukasana Benefits: वाढलेलं वजन कमी करायचंय? फिट शरीरासाठी घरच्या घरी सकाळी करा 'हा' सोपा योगा

SCROLL FOR NEXT