Rahul Gandhi News In Marathi SAAM TV
लोकसभा २०२४

Pune Loksabha: रविंद्र धंगेकरांसाठी काँग्रेसचे दिग्गज मैदानात; राहुल गांधी- प्रियांका गांधी पुण्यात रोड शो करणार!

Rahul Gandhi Road Show Pune: लवकरच काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह प्रियांका गांधी, आणि आदित्य ठाकरे पुण्यात रोड शो करणार आहेत.

Gangappa Pujari

सचिन जाधव, पुणे|ता. ११ एप्रिल २०२४

Pune Loksabha Constituency News:

राज्यात सध्या लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. पुण्यामध्ये काँग्रेसकडून आमदार रविंद्र धंगेकर आणि भाजपचे मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये थेट लढत होणार आहे. एकीकडे मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली असताना आता रविंद्र धंगेकर यांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी तसेच प्रियांका गांधीही मैदानात उतरणार आहेत.

पुणे लोकसभा मतदार संघासाठी महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) काँग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. रविंद्र धंगेकर यांच्यासमोर भाजपचे मुरलीधर मोहोळ यांचे आव्हान आहे. तसेच नुकतेच मनसेमधून वंचित आघाडीमध्ये गेलेले वसंत मोरे यांचेही कडवे आव्हान पाहायला मिळणार आहे. रवींद्र धंगेकरांसाठी राहुल गांधी मैदानात उतरणार आहेत.

लवकरच काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह प्रियांका गांधी, आणि आदित्य ठाकरे पुण्यात रोड शो करणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची देखील पुण्यात सभा होणार असल्याची माहिती काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP) पक्षात मोठा पक्ष प्रवेश होण्याची शक्यता आहे. नुकताच भाजपला रामराम ठोकलेले शिरूर चे भाजप नेते आणि जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रवेश होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

(साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : चित्रपटासाठी ५ कोटींचं कर्ज देतो..., मुंबईत प्रसिद्ध निर्मात्याला लाखोंचा गंडा

Maharashtra News Live Update: दक्षिण सोलापुरात दुष्काळाच्या झळा तीव्र; पाझर तलाव पडले कोरडे

Heart health: तुमच्या हृदयासाठी ही 1 एक्सरसाईज ठरेल बेस्ट; डॉक्टरांनी सांगितली सोपी पद्धत

Petrol saving tips: पेट्रोल पटापट संपतंय? जाणून घ्या गाडी पेट्रोलचा वापर जास्त कधी करते

Pune Accident: पुण्यात आयटी इंजिनिअरचं अपघाती निधन, भरधाव कंटेनरने दुचाकीला चिरडलं

SCROLL FOR NEXT