PM Modi Pune Sabha Saam Tv
लोकसभा २०२४

Maharashtra Loksabha Election: PM मोदींचे मिशन महाराष्ट्र, 2 दिवसांत घेणार 6 सभा; कधी आणि कुठे? घ्या जाणून

PM Modi Maharashtra Sabha: पीएम मोदी २९ एप्रिल आणि ३० एप्रिल अशा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून त्यांच्या ६ सभा होणार आहेत. मोदींच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेद्वारे पीएम मोदी विरोधकांवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.

Priya More

नवनीत पाटणकर, पुणे

लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election 2024) पार्श्वभूमिवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. महाराष्ट्रातील महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मोदींच्या सभा होणार आहेत. पीएम मोदी २९ एप्रिल आणि ३० एप्रिल अशा दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार असून त्यांच्या ६ सभा होणार आहेत. मोदींच्या या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. या सभेद्वारे पीएम मोदी विरोधकांवर निशाणा साधण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्याची माहिती समोर आली आहे. मोदी दोन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या राज्यात सहा सभा होणार आहेत. ⁠२९ एप्रिलला ३ सभा तर ३० एप्रिलला ३ सभा होणार आहे. २९ एप्रिलला सोलापूर, कराड आणि पुणे येथे त्यांची सभा होणार आहे. तर ३० एप्रिल रोजी मोदींची माळशिरस, लातूर आणि धाराशीव येथे सभा होणार आहे. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ पीएम मोदींच्या या सभा होणार आहेत.

पीएम मोदींच्या ⁠२९ एप्रिलच्या सभा -

- सोलापूर शहरात सकाळी ११ वाजता होणार पहिली सभा.

- ⁠कराडमध्ये दुपारी १ वाजता होणार दुसरी सभा.

- पुण्यामध्ये संध्याकाळी ६ वाजता होणार तिसरी सभा.

- पुण्यातील सभेनंतर पीएम मोदी पुण्यात मुक्कामी असणार. राजभवन येथे मोदी राहणार आहेत.

पीएम मोदींच्या ३० एप्रिलच्या सभा -

- माळशिरस येथे सकाळी ११ वाजता होणार पहिली सभा.

- लातुरला दुपारी १ वाजता होणार दुसरी सभा.

- धाराशिव येथे सायंकाळी ४ वाजता होणार तिसरी आणि शेवटची सभा.

दरम्यान, पंतप्रधान मोदी यांची पुण्यामध्ये महायुतीकडून निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिलेले भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारार्थ रेसकोर्स येथील मैदानात जाहीर सभा होणार आहे. त्यानंतर पीएम मोदी यांचा पुणे शहरात रोड शो होणार आहे. त्याचसोबत पीएम मोदी यांची साताऱ्यातील महायुतीचे उमेदवार भाजपचे उदयनराजे भोसले यांच्या प्रचारार्थ कराड येथे जाहीर सभा होणार आहे. पीएम मोदीच्या या सभेची सध्या जोरदार तयारी सुरू आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: महानगरपालिकेच्या वेळेस राष्ट्रवादी बरोबर युती करणं हा चुकीचा निर्णय; सपकाळ

Manoj Jarange Health : मनोज जरांगे पाटील यांची तब्येत पुन्हा बिघडली

Wednesday Horoscope : 6 राशींची होणार चांदी, काहींना डोकं शांत ठेवण्याची गरज; वाचा बुधवारचे राशीभविष्य

Metro 13 Update : मुंबई मेट्रो आता वसई-विरारपर्यंत धावणार; १७,७२४.९९ कोटी खर्च, २५.०३ किमी लांबी, १६ स्थानके, प्रवासाचा वेळ अर्ध्यावर

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! महागाई भत्त्यात वाढ, फडणवीस सरकारचा निर्णय; या तारखेपासून लागू

SCROLL FOR NEXT