Maharashtra loksabha Election: Saamtv
लोकसभा २०२४

Loksabha Election: लोकसभेचा धुरळा अन् प्रचाराचा 'शरद पवार' पॅटर्न; प्रणिती शिंदे, संजय जाधवांनी भर पावसात गाजवल्या सभा!

Maharashtra loksabha Election: शरद पवार यांच्या याच भाषणाचा फंडा महाविकास आघाडीतील नेते वापरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शरद पवारांचा प्रचार पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे

Gangappa Pujari

विश्वभूषण लिमये, सोलापूर|ता. १३ एप्रिल २०२४

२०१९च्या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा झाली ती शरद पवार यांच्या साताऱ्यातील सभेची. साताऱ्यात शरद पवार यांनी भर पावसात केलेल्या धुवाँधार भाषणाने राजकीय चित्रच उलटून गेले. यंदा शरद पवार यांच्या याच भाषणाचा फंडा महाविकास आघाडीतील नेते वापरत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे शरद पवारांचा प्रचार पॅटर्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

प्रणिती शिंदेंची भर पावसात सभा!

सोलापूर लोकसभेत महाविकास आघाडीकडून (Mahavikas Aaghadi) काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर महायुतीकडून आमदार राम सातपुते यांचे आव्हान आहे. सध्या आमदार प्रणिती शिंदे यांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. काल सोलापुरातील बाळे येथे प्रणिती शिंदेंची (Praniti Shinde) कॉर्नर सभा झाली.

शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने या सभेचे आयोजन करण्यात आले होते. ही सभा सुरू असतानाच अचानक पावसाला सुरूवात झाली. यावेळी प्रणिती शिंदे यांनी पावसाला सुरूवात झाल्यानंतरही धुवाँधार भाषण केले. त्यांच्या या पावसातील भाषणामुळे उपस्थितांनाही शरद पवार (Sharad Pawar) यांच्या साताऱ्यातील सभेची आठवण झाली.

संजय जाधवांचीही पावसात सभा...

परभणी लोकसभा (Parbhani) मतदार संघात निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला असून मुख्य लढत महाविकास आघाडीचे संजय जाधव व महायुतीचे महादेव जानकर यांच्यात आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय उर्फ बंडू जाधव यांच्या प्रचार्थ घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे सभा आयोजित करण्यात आली होती.

यावेळी संजय जाधव यांची सभा सुरू होताच अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. यावेळी संजय जाधव यांनी न थांबता आपलं भाषण सुरू ठेवले. त्यांच्या या भाषणाचा व्हिडिओ सध्या माध्यमांवर व्हायरल होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Yavtmal Crime : दोस्त दोस्त ना रहा! संतापलेल्या मित्रानेच जिवाभावाच्या मित्राची केली हत्या, यवतमाळ हादरले

Maharashtra Live News Update : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिवनेरीवर दाखल

Riteish Deshmukh Video : छत्रपतींसमोर नतमस्तक! रितेश देशमुख सकाळी सकाळी पोहचला शिवनेरीवर, म्हणाला...

PM Kisan Yojana: होळीआधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार ₹२०००; पीएम किसान योजनेच्या २२व्या हप्त्याबाबत अपडेट

Election : सरपंच थेट जनतेतूनच ठरणार! सोलापूरमधील ६५५ ग्रामपंचायतीचा धुरळा उडाला, पाहा वेळापात्रक

SCROLL FOR NEXT