Maharashtra Lok Sabha Election Saam Digital
लोकसभा २०२४

Maharashtra Lok Sabha Election : नाशिकच्या जागेवर ठाकरे गटाला उमेदवार मिळेना? महाविकास आघाडीकडे उरला हा पर्याय

Lok Sabha Election 2024 : नाशिक मतदारसंघात ठाकरे गटाला उमेदवार मिळला नाही तर नाशिकची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे घेण्याचा पर्याय महाविकास आघाडीकडे असेल. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत शरद पवार,संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्यामध्ये खडबते सुरू आहेत.

Sandeep Gawade

Maharashtra Lok Sabha Election

निवडणूक जाहीर होऊन देखील नाशिकच्या जागेवरून महाविकास आघाडीत खलबतं सुरूच आहेत. महाविकास आघाडीत ठाकरे गटाला सोडलेल्या नाशिकच्या जागेवरून शरद पवार, संजय राऊत यांच्यात पुन्हा एकदा चर्चा झाली आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते गोकुळ पिंगळे यांना उद्धव ठाकरे गटातून उमेदवारी देण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे. मात्र नाशिकची जागा उद्धव ठाकरे गटाकडून लढण्याऐवजी शरद पवार गटाकडून लढवण्याची गोकुळ पिंगळे यांची तयारी आहे. त्यामुळे पेच निर्माण झाला आहे.

या मतदारसंघात ठाकरे गटाला उमेदवार मिळला नाही तर नाशिकची जागा राष्ट्रवादी शरद पवार गटाकडे घेण्याचा पर्याय महाविकास आघाडीकडे असेल. त्या पार्श्वभूमीवर मुंबईत शरद पवार,संजय राऊत आणि जयंत पाटील यांच्यामध्ये खडबते सुरू आहेत. महायुतीसमोर सक्षम उमेदवार देण्यासाठी महाविकास आघाडीत मोठ्या हालचाली सुरू आहेत.

तर दिंडोरीच्या जागेवर माकने दावा केला असून जागा लढवण्यावर माकप ठाम आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिंडोरीची जागा माकपसाठी सोडावी, असा आग्रह माकपने केला आहे. शरद पवार गटाकडे सक्षम उमेदवार नसल्याचा माकपचा दावा आहे. शरद पवार गटाने जागा न सोडल्यास माकप स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. माजी आमदार जे पी गावित दिंडोरी लोकसभेसाठी इच्छुक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics : एक व्यासपीठ, दोन ठाकरे...महाराष्ट्रातील राजकारण ३६० डिग्री फिरणार, दोन्ही नेत्यांपुढे आव्हाने काय?

Marleshwar Waterfall : रत्‍नागिरीतील मार्लेश्वर धबधब्याचे सौंदर्य जणू स्वर्गच, पावसाळ्यात एकदा भेट द्याच

Diet Soda: तुम्हालाही डाएट सोडा पिण्याची सवय आहे का? वेळीच सोडा नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Sushil Kedia: सुशील केडियांच्या ऑफिस फोडणाऱ्या ५ जणांना अटक! वरळी पोलिसांकडून गुन्हा दाखल, कोणती कलमे लावली? VIDEO

Maharashtra Live News Update: सातारा-पुणे राष्ट्रीय महामार्गावर असणाऱ्या खांबटकी घाटात ट्रकला मोठी आग

SCROLL FOR NEXT