Devendra Fadnavis Saam Tv
लोकसभा २०२४

Devendra Fadnavis: महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला, देवेंद्र फडणवीस यांची माहिती; नाशिक-ठाण्याची जागा मिळणार शिंदेंना?

Lok Sabha Mahayuti Seat Sharing: दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं, तरी महायुतीमधील काही जागांचा अजून तिढा सुटलेला नाही. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.

Rohini Gudaghe

दुसऱ्या टप्प्यातील मतदान (Lok Sabha Election 2024) पार पडलं, तरी महायुतीमधील काही जागांचा अजून तिढा सुटलेला नाही. यासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे.'महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला', असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केलं आहे. त्यांनी लवकरच या सर्व जागांच्या उमेदवाराची घोषणा केली जाणार असल्याचं सांगितलं आहे.

पुढील २४ तासात महायुतीच्या उर्वरित सर्व जागांची घोषणा महायुतीकडून (Mahayuti Seat Sharing) केली जाणार आहे. ठाणे, नाशिक दोन्ही जागा शिवसेनेच्या वाट्याला गेल्याची माहिती सूत्रांकडून मिळत (Lok Sabha Mahayuti Seat Sharing) आहे. तर पालघर आणि दक्षिण मुंबईवरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच सुरूच आहे. ठाण्यातून प्रताप सरनाईक आणि नरेश म्हस्के यांचे नाव आघाडीवर आहे.

तर दक्षिण मुंबईतून मंगलप्रभात लोढा आणि यामिनी जाधव यांच्या नावाची चर्चा सुरू आहे. तर नाशिक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीबाबत महायुतीत सस्पेन्स कायम (Maharashtra Lok Sabha Election) आहे, परंतु लवकरच या जागांवरील उमेदवारांची नावं जाहीर होणार आहेत. आता नाशिक आणि ठाण्याची जागा शिंदेसेनेला मिळणार का? याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे.

ठाण्यातील जागेसाठी शिंदे गट आग्रही असल्याचं दिसत आहे. तर आतापर्यंत शिंदे गटाला १३ जागा देण्यात आल्या (Lok Sabha Mahayuti Seat) आहेत.  नाशिक, पालघर, ठाणे, दक्षिण मुंबई या जागांचा प्रश्न अद्याप सुटलेला (Maharashtra Election) नाही.

महायुतीमध्ये जागावाटपावरून तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु आहे. अशातच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis News) यांनी जागा वाटपाचा तिढा सुटला असल्याचं सांगितलं आहे.  महायुतीच्या उमेदवारांची फायनल यादी पुढील २४ तासांच्या आत जाहीर होणार आहे. 

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नांदेड: आमदार बालाजी कल्याणकर यांच्या समोरच माधव पावडेंनी केलेल्या विधानाने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

कोरियन मुलींसारखा चेहरा हवाय? पार्लरला जाऊ नका, या ५ सोप्या पद्धतीने घरीच मिळवा 'कोरियन ग्लास स्किन

Assam Assembly: विधानसभेत 'यूनिफॉर्म सिविल कोड विधेयक सादर; आतापर्यंत किती राज्यात लागू झालाय UCC कायदा?

Thyroid disorder: सतत बेचैनी आणि हृदयाची धडधड वाढतेय? डॉक्टरांनी सांगितली थायरॉईडच्या कॅन्सरची धोकादायक लक्षणं

Pune : पुण्यातील संतापजनक घटना; बस स्टँडवर तरूणीसमोर हस्तमैथून, पोलिसांनी ४८ तासांत नराधमाच्या मुसक्या आवळल्या

SCROLL FOR NEXT