Raj Thackeray And PM Narendra Modi Rally In Shivaji Park google
लोकसभा २०२४

Maharashtra Election: राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी येणार एकाच मंचावर? शिवाजी पार्कात होणार सभा

Raj Thackeray Rally : राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच मंचावर येणार आहेत. मुंबईतील सहा जागांसाठी शिवाजी पार्कात जाहीर सभा होणार आहे. या सभेसाठी दोन्ही नेते एकाच मंचावर येणार आहेत.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Raj Thackeray And PM Narendra Modi Rally In Shivaji Park :

राज ठाकरे आणि पंतप्रधान मोदी एकाच मंचावर येण्याची शक्यता आहे. येत्या १७ मे रोजी मुंबईच्या शिवाजी पार्कात पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरेंची तोफ धडाडणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. मुंबईतील सहा जागांसाठी शिवाजी पार्कात जाहीर सभा होणार आहे. दरम्यान राज ठाकरे आणि नरेंद्र मोदी विरोधक आणि उद्धव ठाकरेंवर काय टीका करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाहुयात हा रिपोर्ट.

मुंबईतील महायुतीच्या सहा लोकसभा उमेदवारांसाठी स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा होणार आहे. १८ मे रोजी प्रचाराच्या तोफा थंडावतील. त्याआधी १७ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवतीर्थावर सभा घेणार आहेत. दरम्यान मोदींच्या सभेला मनसेप्रमुख राज ठाकरे देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती समोर आलीय.

राज ठाकरे महायुतीसाठी ४ ते ५ सभा घेणार आहेत. ४ मे ला सिंधुदुर्गात नारायण राणेंसाठी पहिली सभा होणार आहे. याशिवाय ठाणे आणि कल्याणमध्ये राज ठाकरेंची सभा होण्याची शक्यता आहे. तर १७ मेला मुंबईतील शिवतिर्थावर मोदींसोबत प्रचारसभांची सांगता होणार आहे.

राज ठाकरेंनी महायुतीसाठी सभा घेण्यावरून अनिल परबांनी निशाणा साधलाय. मला माझ्या कडेवर दुसऱ्याची पोरं खेळवायची नाहीत असं जाहीर सभेतून सांगणारे राज ठाकरे आता कुणाची पोरं खेळवणार आहेत असा सवाल अनिल परबांनी केलाय. दुसरीकडे ठाणे आणि कल्याणच्या सभेसाठी शिंदे गटाकडून राज ठाकरेंची सभांची मागणी करण्यात आलीय. शिंदे गटाचे उमेदवार श्रीकांत शिंदे आणि नरेश म्हस्के यांनी राज ठाकरेंची भेट घेऊन सभेची विनंती केलीय.

लोकसभा निवडणुकीसाठी राज ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना बिनशर्त पाठिंबा दिला. यानंतर पहिल्यांदाच राज ठाकरे आणि नरेंद्र मोदींची भेट होतेय. मुंबई कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलाय. उद्धव ठाकरेंविरोधात पंतप्रधान मोदी स्वत; मुंबईच्या मैदानात उतरलेत. उद्धव ठाकरेंविरोधात राज ठाकरेही मोदींना बळ देणार आहेत. म्हणूनच मुंबईकरांसाठी आणि महाराष्ट्रासाठी मोदी- ठाकरेंची ही सभा ऐतिहासिक ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tiger Shroff Firing: गोळीबारानंतर टायगर श्रॉफची प्रकृती कशी आहे? जॅकी श्रॉफ यांच्या टीमने दिली हेल्थ अपडेट

Tiger Shroff Firing: 'मुंबईकरांच्या सुरक्षेशी तडजोड नाही'; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर एकनाथ शिंदेंचा गुन्हेगारांना इशारा

मुख्यमंत्री विजय यांना मोठा धक्का; TVKच्या बड्या नेत्याला ड्रग्ज प्रकरणात अटक

Tiger Shroff Firing: गोळीबाराच्या घटनेनंतर मुख्यमंत्र्यांचा थेट पोलीस आयुक्तांना फोन; तासाभरात १५ पथकं तयार, एक संशयित ताब्यात

एक फुटाच्या अंतरावरून टायगर श्रॉफच्या कारवर १० राऊंड फायर; हल्ल्याचा थरकाप उडवणारा नवा व्हिडिओ Viral

SCROLL FOR NEXT