लोकसभा २०२४

Ajit Pawar: दहा वर्षात पंतप्रधान मोदींवर एकही आरोप झाला नाही: अजित पवार

Bharat Jadhav

सातारा : आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना देशाचं विकासपुरुष म्हणून ओळखलं जातं. जगातील जेवढी नेते आहेत त्यातून लोकप्रिय राजकीय नेते म्हणून मोदींना ओळखलं जातं. यामुळे त्यांना विजयी करण्यासाठी एक-एक खासदार दिल्लीला पाठवण्याची गरज आहे. पंतप्रधान मोदींच्या कार्यकाळात त्यांच्यावर एकही घोटाळ्याचा आरोप झाला नाहीये, असं म्हणत अजित पवारांनी मोदींच्या कामाचं कौतुक केलंय.

अजित पवार यांनी साताऱ्यात महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी सभा घेतली. यावेळी त्यांनी उदयन राजे यांना भरभरून मतं द्यावीत असं आवाहन केलं. आपल्या भाषणात बोलताना अजित पवार म्हणालेत की, याआधी अनेक नेते पंतप्रधान झालेत. प्रत्येकावर काहींना काही आरोप झालेत.

राजीव गांधी यांच्यावरही बोफर्सचा आरोप झाला. त्यानंतर डॉ. मनमोहनसिंग यांच्यावरही २ जी, कोळसा खाणीमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप झाला होता. आपली विचारधारा वेगळी आहे, फुले, शाहू महाराज यांच्या विचारधारेवर काम करणारा राष्ट्रवादी पक्ष आहे. पण विकासासाठी एक पाऊल पुढे एक पाऊल मागे व्हावे लागतं. या १० वर्षाच्या काळात पंतप्रधान मोदींच्यावर घोटाळ्याचा एकही आरोप झाला नसल्याचं अजित पवार म्हणालेत.

उदयनराजे भोसले हे साताऱ्याच्या गादीचे वारस आहेत. आज अनेक राजकीय पक्ष आपल्या सभांमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेत असतात. शिवाजी महाराज यांनी १८ पगड जाती एकत्र घेऊन हिंदवी स्वराज्याचं स्थापन्याचं काम केलं, हे आम्ही वारंवार सांगत असतो. हाच आदर्श आपल्या डोळ्यापुढे आहे. त्यामुळे विकासकामांबाबत चिंता करू नका. मी आपल्याकडे विकासकामांसाठी मते मागण्यासाठी आल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले.

नरेंद्र मोदींच्या या १० वर्षाच्या काळात अनेक विकासकामे झालीत. अनेक विमानतळ, रेल्वेस्थानकं, मेट्रोस्टेशन, वंदे भारत, अशी कामे केली गेली. नुसत्या पुण्यात १६ हजार कोटी रुपयांचा निधी विकासकामांसाठी देण्यात आलाय. राज्याच्या निधीला केंद्राची निधी जोड मिळाली तर आपल्या परिसराचा विकास अधिक होईल. त्यासाठी केंद्राचा निधी आणणायचा असेल तर मोदी सरकारच्या विचाराचा खासदार दिल्लीत पाठवला पाहिजे. म्हणून मी तुला येथे सांगतोय तुम्ही नेहमी घड्याळाला निवडणून दिलं. त्यामुळे आताही घड्याळाला निवडून द्या. महायुतीचा उमेदवाराला वाई, महाबळेश्वर, खंडाळा,येथून एक लाख अधिक मतांनी निवडून द्या, असं अजित पवार म्हणालेत.

भारतीय विद्यार्थ्यांना परत आणण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही काळ युद्ध थांबवल्याचा दावा भाजप नेत्यांकडून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात करण्यात येतोय. आता अजित पवार यांनी हा दावा केलाय. साताऱ्यातल्या प्रचारसभेत बोलताना अजित पवार यांनी याचा उल्लेख केला. भारतीय विद्यार्थ्यांना युद्धातून बाहेर काढण्यासाठी मोदींना फोन केल्यानंतर त्यांनी तुम्ही काळजी करु नका असं म्हटलं आणि त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांनी फोन करून युद्ध काही काळ थांबवण्यास सांगितलं आणि भारतीय विद्यार्थ्यांना सोडवून आणलं होतं. त्या कामांसाठी दमदार नेता लागतो. ते वेड्या गबाळ्याचं काम नाही. धडाकेबाज नेत्यांचं काम असतं. असं अजित पवार म्हणाले.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीमध्ये रामटेक, दक्षिण नागपूरच्या जागेवरून वाद

Jarange vs BJP: मराठे भाजपचा एन्काऊंटर करणार; मनोज जरांगेंचा ट्रॅप, महायुतीला ताप?

Central Railway: मध्य रेल्वे मार्गावर कसाऱ्याजवळ स्पेशल पॉवर ब्लॉक, काही ट्रेनच्या मार्गात बदल तर काही रद्द; वाचा लिस्ट

Pune Crime: मोबाईल काढून घेतल्याने अल्पवयीन मुलाचा आईवर हल्ला, लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् कात्रीने वार, पुण्यात खळबळ

Indian Oil Job: सरकारी नोकरीची संधी, इंडियन ऑइलमध्ये 'या' पदांसाठी निघाली भरती; अशा पद्धतीने करा अर्ज

SCROLL FOR NEXT