PM Modi Pune Sabha Yandex
लोकसभा २०२४

PM Modi Sabha: पुण्यात PM मोदींच्या सभेसाठी तगडा बंदोबस्त; ५ हजार पोलीस तैनात, नागरिकांसाठी नियमावली

Maharashtra Election Lok Sabha 2024: महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची २९ एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभेसाठी पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे.

Rohini Gudaghe

सागर आव्हाड साम टीव्ही, पुणे

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पंतप्रधान मोदी यांची २९ एप्रिल रोजी पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांच्या सभेसाठी (PM Modi Pune Sabha) पुण्यात तगडा पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. पुण्यामध्ये नरेंद्र मोदींच्या सभेसाठी पाच हजार पोलीस तैनात असणार आहेत. या सभेत सहभागी नागरिकांना काही नियमांचं पालन करावं लागणार आहे.

पुणे लोकसभा मतदारसंघात भाजप महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारासाठी २९ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Pune Lok Sabha) यांची सभा होणार आहे. या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी मैदान आणि मार्गांची पाहणी केली आहे. यावेळी शहरात मोदींच्या सभेला भाजपने सुमारे ६० हजार नागरिक जमण्याचा अंदाज वर्तवला आहे.

पंतप्रधान मोदींच्या सभेसाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन पार्किंग आणि वाहतूक मार्गांचे नियोजन करण्यात येणार आहे. तसंच सभास्थानी (PM Modi Pune Visit) मोबाईल व्यतिरीक्त कोणतीही वस्तू नेण्यास प्रतिबंध केला जाणार आहे. जिल्ह्यांतून पोलिसांच्या पाच जादा तुकड्या मागवण्यात आल्या आहेत. याबरोबरच केंद्रीय तपास यंत्रणा आणि सुरक्षा यंत्रणाही बंदोबस्तात असणार आहेत.

पुण्यात स.प.महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान मोदी यांची सभा २९ एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आली (Maharashtra Election) आहे. यापार्श्वभूमीवर पुण्यात तगडा बंदोबस्त करण्यात येत आहे. राज्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला वेग आलेला आहे. पहिल्या टप्प्यातील निवडणूका पार पडल्या आहेत. २६ एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील निवडणुका आहेत.

महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ २८ एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींची कोल्हापुरात जाहीर सभा होणार आहे. कोल्हापूर लोकसभेसाठी (Lok Sabha 2024) महायुतीचे उमेदवार खासदार संजय मंडलिक तर हातकणंगले लोकसभेसाठी महायुतीचे उमेदवार खासदार धैर्यशील माने यांच्या प्रचारासाठी मोदींची सभा आयोजित करण्यात आली आहे.

कोल्हापुरातील तपोवन मैदान येथे पंतप्रधान मोदींची सभा होणार आहे. या सभेला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री (Lok Sabha Election) देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह अनेक नेते राहणार उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Diwali Bonus: राज्यातील 'या' सरकारी बँकेच्या कर्मचाऱ्यांची धनधन दिवाळी; मिळाला २० वर्षातील सर्वाधिक बोनस

Crime : काम देतो म्हणत नेलं, सामूहिक अत्याचारानंतर बेदम मारलं; अमानुष छळामुळे आदिवासी महिलेचा मृत्यू

Sharad Pawar: निवडणुकांच्या तोंडावर शरद पवारांनी नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांना कोणता कानमंत्र दिला? बघा VIDEO

Tuesday Horoscope : आनंदी आनंद होणार, आयुष्यात सुंदर घटना घडतील; ५ राशींच्या लोकांचे नशीब चमकणार

Face Care: चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स आणि पिंपल्स कमी करुन नॅचरल सोफ्ट ग्लोईंग चेहरा पाहिजे; मग 'हे' घरगुती फेसपॅक नक्की लावा

SCROLL FOR NEXT