Eknath Shinde shiv sena in Trouble In Thane saam
लोकसभा २०२४

Maharashatra Election: ठाण्यात शिंदे सेनेचं टेन्शन वाढलं? ठाण्याचा किल्ला राखणं शिंदेंना जड?

Thane Loksabha : नाईक गटाने बंडाचं हत्यार उपसल्यामुळे ठाण्याचं किल्ला राखणं शिंदे गटासाठी जड जाण्याची शक्यता आहे. पाहुयात हा रिपोर्ट

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Eknath Shinde shiv sena in Trouble In Thane : नवी मुंबईतील भाजप कार्यकर्त्यांनी नरेश म्हस्केंच्या उमेदवारीला जोरदार विरोध केलाय.. ठाणे लोकसभेची उमेदवारी माजी खासदार संजीव नाईकांना न मिळाल्यामुळे शेकडो भाजप कार्यकर्त्यांनी राजीनामे देत निषेध दर्शवला.. मिरा भाईंदरमध्येही भाजप कार्यकर्त्यांचं राजीनामा सत्र पाहायला मिळालं. दरम्यान नाईक गटाने बंडाचं हत्यार उपसल्यामुळे ठाण्याचं किल्ला राखणं शिंदे गटासाठी जड जाण्याची शक्यता आहे. पाहुयात हा रिपोर्ट

मुख्यमंत्री शिंदेंनी महायुतीत ठाण्याची जागा खेचून आणत आपले विश्वासू नरेश म्हस्के यांना उमेदवारी दिली. मात्र ठाण्याची जागा राखणं आता शिंदे गटासाठी जड जाण्याची शक्यता दिसतेय. संजीव नाईकांना उमेदवारी का दिली नाही? असा सवाल करत शेकडो भाजप पदाधिकाऱ्यांनी राजीनामा दिलाय.

गणेश नाईकांच्या भेटीसाठी आलेल्या नरेश म्हस्केंनाही कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलं. कार्यकर्त्यांचा आक्रोश बघून नरेश म्हस्केंनी काढता पाय घेतला.

म्हस्केंच्या उमेदवारीवरून नाराजी

1996 पासून ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला आहे..

-2014 आणि 2019 असे सलग दोन टर्म राजन विचारे ठाण्याचे खासदार आहेत.

फक्त 2009 साली संजीव नाईक यांनी राष्ट्रवादीच्या तिकीटावर ठाणे लोकसभेतून विजय मिळवला होता.

म्हणूनच नाईक समर्थकांना संजीव नाईक यांना उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा होती.

मात्र नरेश म्हस्केंच्या नावावर शिक्कमोर्तब झाल्यामुळे नाईट गटात नाराजी पसरली.. दरम्यान भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजप नेते संदीप नाईक यांनी कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचं आश्वासन दिलंय.

ठाण्याची लढत ही एकनाथ शिंदेंसाठी अस्तित्वाची लढाई ठरणार आहे.. शिवसेना विरुद्ध शिवसेनेच्या लढाईमध्ये कोणत्याही परिस्थितीत त्यांना ठाण्याचा किल्ला राखायचाय.. त्यामुळे भाजप नेते आणि कार्यकर्ते एकदिलाने नरेश म्हस्केंच्या पाठिशी उभे राहणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : गणेश विसर्जन मिरवणुकीत आमदार सतेज पाटील यांचा डान्स

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT