Maha Vikas Aghadi Gave New Proposal to Vanchit Bahujan Aghadi Saam Tv
लोकसभा २०२४

Lok Sabha Election 2024: मविआचा वंचितला नवीन प्रस्ताव, प्रकाश आंबेडकर करणार स्वीकार?

Maha Vikas Aghadi News: जागावाटपावरून वंचित बहुजन आघाडी दूर होतेय की काय, असा प्रश्न निर्माण झालेला असताना मविआने वंचितला जागावाटपाचा नवीन प्रस्ताव दिला आहे.

साम टिव्ही ब्युरो

>> गिरीश कांबळे

Lok Sabha Election 2024:

लोकसभा निवडणुकीची घोषणा होऊन दोन आठवडे झाले आहेत. मात्र राज्यात काँग्रेस व्यतिरिक्त अद्याप महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाने जागावाटपाची यादी जाहीर केलेली नाही. यातच जागावाटपावरून वंचित बहुजन आघाडी दूर होतेय की काय, असा प्रश्न निर्माण झालेला असताना मविआने वंचितला जागावाटपाचा नवीन प्रस्ताव दिला आहे.

मविआने वंचिताला चार जागांचा प्रस्ताव दिला होता. ज्यावरून वंचितने नाराजी व्यक्त केली होती. तसेच वंचितने मविआपासून दूर जाण्याचे संकेतही दिले होते. यातच आता मविआने वंचितला जागावाटपाचा नवीन प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महाविकस आघाडीने वंचित बहुजन आघाडीला आता चार ऐवजी पाच जागांचा प्रस्ताव दिला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वंचित बहुजन आघाडीला प्रस्ताव दिल्यानंतर महाविकास आघाडीने आता वेट अँड वॉचची भूमिका घेतली असल्याचं सांगण्यात येत आहे. यातच वंचित बहुजन आघाडीने आपली भूमिका स्पष्ट केल्यानंतर शिवसेना उद्धव ठाकरे गट लोकसभा निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे.  (Latest Marathi News)

मविआच्या प्रस्तावावर वंचितची काय आहे प्रतिक्रिया?

याचबाबत माहिती देताना वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्ते सिद्धार्थ मोकळे म्हणाले की, ''वंचित बहुजन आघाडीचा आगामी लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपासंदर्भात जो निर्णय आहे, तो आज संध्यकाळी वंचितच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला जाणार आहे. याबाबत आज सविस्तर चर्चा केली जाईल आणि निर्णय घेतला जाईल. तसेच हा निर्णय उद्या सकाळी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केला जाईल.''

महाविकास आघाडीकडून वंचितला काही निरोप आला आहे का? याबाबत त्यांना पत्रकारांनी विचारले असता, ते म्हणाले की, ''आता त्यासंदर्भात जी काही माहिती असेल ती वंचितचे अध्यक्ष प्रकार आंबेडकर उद्या पत्रकार परिषद घेऊन जाहीर करतील.''

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sangali Nag Panchami : सांगलीकरांची २३ वर्षांची प्रतीक्षा संपली, जिवंत नाग पकडण्याला परवानगी, नेमकं प्रकरण काय?

Honey Trap : नाशिकनंतर सांगलीतही हनी ट्रॅप, २ माजी मंत्र्यांचा सहभाग, खडसेंचा खळबळजनक दावा

Maharashtra Live News Update : माणिकराव कोकाटे अजित पवारांच्या भेटीसाठी रवाना, राजीनामा देणार का?

Blocked heart arteries: शरीरात होणारे 'हे' 5 बदल सांगतात हृदयाच्या नसा झाल्यात ब्लॉक; लक्षणं वेळीच ओळखून करा उपचार

Shriya Pilgaonkar: 'आम्हाला तुझा विशेष अभिमान...' सचिन पिळगावकरची लेकीसाठी खास पोस्ट

SCROLL FOR NEXT