PM Modi Road Show Stage Broken Saam Tv
लोकसभा २०२४

PM मोदींच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळला, एकमेकांवर पडले कार्यकर्ते; VIDEO

Madhya Pradesh News: देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राजकीय पक्षांचे दिग्गज नेते प्रचारात व्यस्त आहेत. काही जाहीर सभा घेत आहेत, तर काही रोड शो करत आहेत.

साम टिव्ही ब्युरो

PM Modi Road Show Stage Broken:

देशात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. राजकीय पक्षांचे दिग्गज नेते प्रचारात व्यस्त आहेत. काही जाहीर सभा घेत आहेत, तर काही रोड शो करत आहेत. यावेळी सगळ्याच पक्षांच्या नेत्यांच्या सभेला आणि रोड शोदरम्यान कार्यकर्त्यांची व मतदारांची मोठी गर्दी होताना दिसत आहे.

यातच मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या रोड शोदरम्यान स्टेज कोसळल्याची बातमी समोर अली आहे. स्टेज कोसळल्याने कार्यकर्ते एकमेकांवर पडले. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

मिळालेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदींनी रविवारी मध्य प्रदेशातील जबलपूरमध्ये रोड शो केला. खुल्या जीपमधून पंतप्रधान लोकांचे स्वागत करत असताना मोठा अपघात झाला. कटंगा ते गोरखपूर मार्गावर पंतप्रधान मोदींच्या रोड शोदरम्यान एक स्टेज कोसळला. स्टेजवर उभे असलेले लोक एकमेकांवर पडले, त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. या अपघातात लोकांना किरकोळ दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.  (Latest Marathi News)

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हा रोड शो एक किलोमीटरहून अधिक चालला. यावेळी लोक मोदी-मोदीच्या घोषणा देताना दिसले आणि त्यांच्या हातात भाजपचे झेंडे होते. स्टेजवर क्षमतेपेक्षा जास्त लोक उभे होते, त्यामुळे ही दुर्घटना घडली.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. आचारसंहिता लागू झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिलाच जबलपूर दौरा आहे. त्यांनी जबलपूर भाजपचे उमेदवार आशिष दुबे यांच्यासाठी मते मागितली. यावेळी पंतप्रधान मोदींसोबत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादवही उपस्थित होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care Tips : ऑक्टोबर हिटमध्ये चेहरा काळा पडतोय? लगेच करा 'हे' ६ सोपे उपाय; त्वचेचा ग्लो तसाच राहील

Investment Plan Fact Check: 22 हजार गुंतवा, रोज 90 हजार कमवा? अर्थमंत्र्यांच्या घोषणेचा व्हिडिओ व्हायरल?

Thursday Horoscope: स्वामिंची कृपा होणार! 5 राशींच्या व्यक्तींचे पैशाचे अडथळे दूर, वाचा गुरुवारचे राशीभविष्य

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

SCROLL FOR NEXT