गिरीश निकम, साम प्रतिनिधी
देशात भाजपला पूर्ण बहुमत न मिळाल्यामुळे भाजपची सारी मदार आता एनडीएतल्या घटक पक्षांवर आहे. त्यामुळे आता एनडीएतले सर्वात मोठे मित्र पक्ष असलेले जेडीयूचे सर्वेसर्वा नितीश कुमार आणि टीडीपीचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांच्यावर सगळं सत्तेचं समीकरण अवलंबून आहे. त्यात नितीश कुमार यांचं बेभरवशाचं राजकारण पाहता त्यांच्या भूमिकेबाबत अधिक उत्सुकता आहे.
कारण एनडीएच्या बैठकीसाठी दिल्लीला जाताना नितीश कुमार आणि इंडिया आघाडीतील मित्र पक्ष असलेल्या आरजेडीचे नेते तेजस्वी यादव एकाच विमानातून गेले. त्यात दिल्लीला उतरताना तेजस्वी यादव यांनी दिलेल्या प्रतिक्रियेमुळे आणखीनच तर्क वितर्कांना उधाण आलंय.
'इंडिया' आघाडीने नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांना आपल्या सोबत घेण्यासाठी हालचाली सुरू केल्यात. काही मित्र पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केल्याचीही चर्चा आहे. नितीश कुमार यांचा राजकीय इतिहास पाहता त्यांची पलटूराम म्हणूनच ख्याती आहे. त्यामुळे ते कधी, केव्हा, कुणासोबत आघाडी करतील याचा नेम नाही.
नितीश कुमार पलटी मारणार?
नितीश कुमार पलटी मारणार? (H)
1998 - नितिश कुमार एनडीएमध्ये सहभागी झाले
2014 - भाजपनं पंतप्रधानपदासाठी मोदींचं नाव पुढे केल्यामुळे एनडीएतून बाहेर पडले
2014 - आरजेडी आणि काँग्रेससोबत आघाडी केली
2015 - बिहार विधानसभा निवडणुकीत नितीश कुमारांनी भाजपचा पराभव केला
2017 - आघाडीतून बाहेर पडत एनडीएत सहभागी झाले आणि भाजपसोबत सत्ता स्थापन केली
2020 - नितीश कुमारांनी भाजपसोबत विधानसभा निवडणूक लढवली
2022 - भाजपची साथ सोडली. आरजेडी, काँग्रेससोबत बिहारमध्ये सत्ता स्थापन केली
2024 - लोकसभा निवडणुकीपूर्वी नितीश कुमार इंडिया आघाडीतून बाहेर पडले आणि पुन्हा एनडीएसोबत गेले
त्यामुळे नितीश कुमार पुन्हा एनडीए सोडून येतील अशी आशा इंडिया आघाडीतल्या नेत्यांना आहे. चंद्राबाबू नायडू हे मधला काही काळ वगळता नेहमीच एनडीएसोबत होते. त्यामुळे त्यांच्याबाबत तेवढी चर्चा नाही. मात्र नितीश कुमार यांचा तेजस्वी यादवांसोबतचा विमान प्रवास चर्चेत आलाय. नितीश कुमार यांचं बेभरवशाचं राजकारण पाहता त्यांचं विमान एनडीए आघाडीत लँड होणार इंडिया याबाबत सा-या देशाला उत्सुकता लागलीय.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.