Uttam Jankar On Ajit Pawar Saam Tv
लोकसभा २०२४

Uttam Jankar On Ajit Pawar: अजितदादांचा पराभव केल्याशिवाय मी माढ्याला परत येणार नाही, उत्तम जानकरांचा निर्धार

Uttam Jankar: इंदापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये उत्तम जानकर यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'अजितदादांचा पराभव केल्याशिवाय मी माढ्याला परत येणार नाही.', असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

Priya More

माळशिरस तालुक्यातील धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर (Uttam Jankar) यांनी राष्ट्रावादी काँग्रेस शरदचंद्र गटाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना पाठिंबा दिला. त्यामुळे माढा लोकसभा मतदारसंघात महायुतीला मोठा धक्का बसला आहे. अशामध्ये आता उत्तम जानकर हे शरद पवार गटाच्या उमेदवारांच्या प्रचार सभांमध्ये हजेरी लावत आहे. अशामध्ये इंदापूरमध्ये झालेल्या सभेमध्ये उत्तम जानकर यांनी अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर जोरदार निशाणा साधला. 'अजितदादांचा पराभव केल्याशिवाय मी माढ्याला परत येणार नाही.', असे वक्तव्य त्यांनी केले आहे.

इंदापूरच्या सभेत बोलताना उत्तम जानकर म्हणाले की, 'अजित पवार यांच्या पक्षाचा पहिला जो स्टॅम्प द्यावा लागतो तो मी दिला असून मी परवा माझ्या भाषणात सांगितलं की अजित पवारांचा पराभव केल्याशिवाय मी माढ्याला परत येणार नाही. शरद पवारसाहेबांचे घड्याळ चोरून नेले आहे. ते अजित पवारांच्या पराभवाशिवाय साहेबांच्या पायावर येऊ शकत नाही. राज्यातल्या सरकारला सरकार चालवण्यासाठी अजित पवारांची गरज नव्हती. मात्र सह्याद्रीसारखे स्वाभिमान असलेले साहेब आणि त्यांची बारामती संपवायची याभागातील नेतृत्व नामशेष करून. जसं मला आणि मोहिते पाटलांना संपवलं. त्याचपद्धतीने अजित पवारांना देखील याच तालुक्यात पाल ठोकून ठेवायचं असा डाव भाजपचा आहे.', असा आरोप उत्तमराव जानकर यांनी केला आहे.

तर दुसरीकडे पंढरपूरमध्ये देखील माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी अजित पवारांवर टिका केली आहे. 'राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवारांना काढू शकतो.', असा इशारा उत्तम जानकर यांनी दिला आहे. उत्तम जानकर यांनी सांगितले की,'अजित पवार जर शरद पवारांना पक्षातून काढू शकतात तर मीसुद्धा अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून काढू शकतो.' असं मोठं विधान त्यांनी केले आहे.

उत्तम जानकर यांनी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांना जाहीर पाठिंबा दिला आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाने कारवाई केली का असे विचारले असता जानकरांनी थेट अजित पवारांनाच थेट आव्हान पक्षातून काढण्याची धमकी वजा इशारा दिला आहे. अलिकडेच जानकर यांनी मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात राहून बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव करून पक्ष सोडणार असं विधान केले होते. त्यानंतर जानकर यांनी थेट अजित पवारानांच पक्षातून काढण्याचा इशारा दिला आहे. यावर अजित पवार काय उत्तर देणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.‌

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT