Maharashtra's 48 Constituencies Voting Percentage Saam TV
लोकसभा २०२४

Maharashtra Election 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात किती टक्के मतदान झालं?, एका क्लिकवर वाचा सविस्तर

Percentage Of Voting In Maharashtra Lok Sabha Constituencies: लोकसभा निवडणूक २०२४ साठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघामध्ये मतदान झालं. या प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमकं किती टक्के मतदान झालं हे घ्या जाणून...

Priya More

लोकसभा निवडणुकीसाठी (Loksabha Election 2024) महाराष्ट्रात ५ टप्प्यामध्ये मतदान पार पडलं. १९ एप्रिल ते २० मे यादरम्यान ५ टप्प्यामध्ये मतदानाची ही प्रक्रिया पार पडली. या निवडणुकीसाठी राज्यात सर्वच राजकीय पक्षांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत ते निकालाकडे. येत्या ४ जून रोजी लोकसभा निवडणुकचा निकाल लागणार असून सर्व चित्र स्पष्ट होईल.

महाराष्ट्रात ४८ लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र राज्यात सर्वच ठिकाणी नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत मतदान केलं होतं. राज्यातील प्रत्येक मतदारसंघामध्ये नेमकं किती टक्के मतदान झालं यावर आपण नजर टाकणार आहोत...

राज्यात ५ टप्प्यांसाठी कधी झालं मतदान -

- पहिला टप्पा - 19 एप्रिल

- दुसरा टप्पा - 26 एप्रिल

- तिसरा टप्पा - 7 मे

- चौथ्या टप्पा - 13 मे

- पाचवा टप्पा - 20 मे

महाराष्ट्रात ५ टप्प्यात कुठे-कुठे झालं मतदान -

पहिला टप्पा -

19 एप्रिल रोजी रामटेक, नागपूर, भंडारा- गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या लोकसभा मतदारसंघात झालं मतदान.

दुसरा टप्पा -

26 एप्रिल रोजी बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या लोकसभा मतदारसंघात झालं मतदान.

तिसरा टप्पा -

7 मे रोजी रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले या लोकसभा मतदारसंघात झालं मतदान.

चौथा टप्पा -

13 मे रोजी नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड या लोकसभा मतदारसंघात झालं मतदान.

पाचवा टप्पा -

20 मे रोजी धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबई-दक्षिण मध्य, मुंबई दक्षिण, मुंबई- उत्तर पश्चिम, मुंबई- उत्तक पूर्व, मुंबई- उत्तर मध्य, मुंबई उत्तर या लोकसभा मतदारसंघासाठी झालं मतदान.

कोणत्या मतदारसंघात किती टक्के झालं मतदान -

पहिला टप्पा -

रामटेक 61.01 टक्के , नागपूर - 54.31 टक्के, भंडारा- गोंदिया - 67.04 टक्के, गडचिरोली-चिमूर - 71.99 टक्के, चंद्रपूर - 67.55 टक्के मतदान झालं.

दुसरा टप्पा -

बुलडाणा 62.03 टक्के, अकोला- 61.79 टक्के, अमरावती - 63.37 टक्के, वर्धा - 64.85 टक्के, यवतमाळ - वाशिम - 62.87 टक्के, हिंगोली- 63.54 टक्के, नांदेड - 60.94 टक्के, परभणी - 62.26 टक्के मतदान झालं.

तिसरा टप्पा -

रायगड - 56.72 टक्के, बारामती - 53.08 टक्के, धाराशीव - 62.45 टक्के, लातूर - 63.32 टक्के, सोलापूर - 53.91 टक्के, माढा - 62.17 टक्के, सांगली - 62.84 टक्के, सातारा - 57.38 टक्के, रत्नागिरी- सिंधुदुर्ग - 55.68 टक्के, कोल्हापूर - 56.18 टक्के, हातकणंगले - 68.07 टक्के मतदान झालं.

चौथा टप्पा -

नंदूरबार - 70.68 टक्के, जळगाव -54.47, रावेर -64.28, जालना - 69.19, छत्रपती संभाजीनगर - 63.03 टक्के, मावळ - 54.87 टक्के, पुणे - 53.54 टक्के, शिरुर - 54.16 टक्के, अहमदनगर - 66.61 टक्के, शिर्डी - 63.03 टक्के, बीड - 70.92 टक्के मतदान झालं.

पाचवा टप्पा -

धुळे - 60.21 टक्के, दिंडोरी - 62.66 टक्के, नाशिक- 60.75 टक्के, पालघर -63.91 टक्के, भिवंडी -69.89 टक्के, कल्याण - 50.12, ठाणे - 52.09 टक्के, मुंबई-दक्षिण मध्य - 53.60 टक्के, मुंबई दक्षिण -50.06 टक्के, मुंबई- उत्तर पश्चिम - 54.84 टक्के, मुंबई- उत्तर पूर्व-56.37 टक्के, मुंबई- उत्तर मध्य - 51.98 टक्के, मुंबई उत्तर - 57.02 टक्के मतदान झालं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: कन्नड नगर परिषदेची दुमजली इमारत कोसळली

Leftover Rice: शिळा भात खाल्ल्यास आरोग्यावर कोणते परिणाम होतात?

Late Night Awake: तुम्हालाही रात्री उशिरा पर्यंत जाग राहण्याची सवय आहे? वेळीचं व्हा सावधान नाहीतर होतील 'हे' गंभीर परिणाम

Dhule Crime : वाढदिवसाच्या निमित्ताने बोलावत मित्राचा घातपात; कन्नड घाटात सापडलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, नातेवाईक संतप्त

Mumbai Local: लोकलमधून प्रवासी पडला अन्...; हार्बरची सेवा विस्कळीत|VIDEO

SCROLL FOR NEXT