Lok sabha Election Result 2024 Saam Digital
लोकसभा २०२४

Lok sabha Election Result 2024: एनडीए आणि इंडिया आघाडीत अटीतटीची लढत! राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कोण पुढे?

Lok Sabha Election Result 2024 Live Coverage: लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीत राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कोण पुढे आहे, हे जाणून घेऊ..

Satish Kengar

लोकसभा निवडणुकीसाठी मागील दोन तासांपासून मतमोजणी सुरु झाली असून प्रारंभिक कलनुसार, एनडीए आगाडीवर असल्याचं चित्र आहे. तर इंडिया आघाडीच्या जागांमध्येही मोठी वाढ होताना दिसत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एनडीए 285 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी 225 जागांवर आगाडीवर असल्याचं दिसत आहे. यातच हिंदी भाषिक पट्टयातील राज्य असलेल्या राजस्थान, हरियाणा, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशात कोण पुढे आहे, हे जाणून घेऊ...

राजस्थानमध्ये कोण आघाडीवर?

राजस्थानमध्ये एकूण लोकसभेच्या 25 जागा असून येथे भाजप सत्तेत आहेत. राज्यात मतमोजणीत एनडीए पुढे असल्याचं चित्र आहे. एनडीए येथे 13 जागांवर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी 11 आणि इतर 1 जागेवर आघाडीवर आहे.

हरियाणात काय आहे चित्र?

हरियाणामध्ये एकूण लोकसभेच्या 10 जागा असून येथे भाजप सत्तेत आहेत. राज्यात मतमोजणीत इंडिया आघाडी पुढे आहे. येथे इंडिया आघाडी 7 जागावर आघाडीवर आहे, तर एनडीए 3 जागेवर आघाडीवर आहे.

छत्तीसगड

छत्तीसगडमध्ये एकूण लोकसभेच्या 11 जागा असून येथे भाजप सत्तेत आहेत. राज्यात मतमोजणीत एनडीए पुढे आहे. एनडीए येथे 9 जागावर आघाडीवर आहे. तर इंडिया आघाडी 2 जागेवर आघाडीवर आहे.

मध्य प्रदेश

मध्य प्रदेशमध्ये एकूण लोकसभेच्या 29 जागा असून येथे भाजप सत्तेत आहेत. राज्यात मतमोजणीत एनडीए पुढे आहे. येथे सर्वच जागेवर एनडीए आघाडीवर आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT